पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा कार्यक्रम
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : राज्याचे गृह निर्माण, गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर दि. २१ मार्च रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. दि.२१ मार्च रोजी रात्री ९.४० वाजता नागपूर येथून वर्धेकडे प्रयाण करतील रात्री १०.५० वाजता वर्धा येथे आगमन व मुक्काम. दि. २२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजता प्रशासकीय कामाकरीता राखीव. दुपारी १ वाजता सर्कस ग्राऊंड येथे आयोजित वर्धिनी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २ ते ४ प्रशासकीय कामाकरीता राखीव. सायंकाळी ६ वाजता स्वावलबी मदानयेथे आयोजित वर्धा जिल्हा पोलीस कल्याण निधीकरीता स्वरतंरग या कार्यक्रमास उपस्थिती. दि.२३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता इंद्रप्रस्थ न्यू आर्ट, सायन्स न्ड कामर्स कॉलेज येथे आयोजित युथ पार्लमेन्ट कार्यक्रमास उपस्थिती.
सकाळी १० वाजता वर्धा येथून हिंगणघाट कडेप्रयाण करतील. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सादर्यीकरणाच्या कामाची पाहणी करतील. दपारी १२ वाजता हिंगणघाटयेथील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्स यांच्या चौथ्या शाखेच्या शुभारंभकार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता हिंगणघाट येथून वर्धेकडे प्रयाण करतील. दुपारी २ते ४ वाजेपर्यंत प्रशासकीय कामाकरीता राखीव. सायंकाळी ४ वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रयाण करतील.