
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशाच्या मृत्यूप्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर सत्ताधाऱ्यानी आदित्य ठाकरवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याच मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. असे असतानाच या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. खोटेनाटे आरोप करत असाल तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.