संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क असतांना जिल्हयात बोगस बियाणे, खते येतातच कशी?; खासदार अमर शरदराव काळे यांचा प्रशासनाला सवाल
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दि. ९.५.२०२६ ला जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी आढावा सभा घेण्यात आली होती. या सभेत कृषी संबंधी इतर प्रश्नांसोबतच बोगस बियाणे व खते विकणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार अमर काळे यांनी प्रशासनाला दिले होते. विशेष म्हणजे सभेच्या दोन दिवस आधी नाचणगाव येथे बोगस खते विक्री करतांना एका कृषी केंद्र चालकावर कार्यवाही करण्यात आली होती.
खासदार अमर काळे यांनी निर्देश दिल्यानंतरही वर्तमानपत्रात जिल्हयात बोगस बियाणे आढळल्याच्या घटना घडत आहेत. एवढे मोठे प्रशासन, पोलीस विभाग, कृषी विभाग, महसुल विभाग जिल्हयात कार्यरत असतांना बाहरील जिल्हयातन व राज्यातन जिल्हयात बोगस बियाणे, खते वर्धा जिल्हयात येतातच कशी? हाही एक मोठा यक्ष प्रश्न आहे. कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी काय करतात. प्रत्येक खेडे विभागात कृषी सहाय्यकापासून तर उपविभागीय कषी अधिकाऱ्यांपर्यंत असलेली यंत्रणा काय करते. केवळ कार्यालयात बसून फाईलीच पलटविल्या जातात कार्यालयात बसून व सर्व कार्यभार करुन सर्व काही अलबेल आहे.
येतात बोगस बियाणे येऊ दया आल्यावर पाहू. आढळला तर कृषी केंद्रचालकावर कार्यवाही करु अशी भूमिका तर कृषी विभागाने घेतली नाही ना? अशीही शंका खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली. मुळात प्रश्न असा आहे की, जिल्हयात गाव खेडयापर्यंत कृषी विभाग कार्यरत आहे तर मग बाहेरील राज्यातून एवढे मोठे अंतरावरुन बोगस बियाणे बिनधोकपणे शहरात येतेच कसे? त्यांची इतक्या लांब पल्ल्यात कुठेच काय वाहतुक करत आहे याची चौकशी होत नाही काय? कंपनी जर बोगस माल तयार करत असेल तर प्रशासन कंपनीवरच कार्यवाही का करत नाही? असाही सवाल खासदार अमर काळे यांनी उपस्थितांना केला आहे.
बोगस बियाणे, खते, किटकनाशके शेतकऱ्यांना विकण्याचे वेळी उघडकीस येणे हे कृषी मंत्रालय ते खेडे विभागात कार्यरत कृषी सहाय्यका पर्यंत जी यंत्रणा आहे. त्या यंत्रणेचे हे अपयश आहे असे म्हणावयास हरकत नाही व थातूर मातूर वषात दान चार बोगस बियाण आढळल्याची कार्यवाही करुन आपले अपयश झाकण्याचा तर कृषी विभाग प्रयत्न करीत नाही ना? असाही प्रश्न खासदार अमर काळे यांनी केला. हा प्रकार विना वरदहस्ता शिवाय होऊ शकत नाही? फक्त गरज आहे ती प्रामाणिक मानसिकतेची ती असेल तर बोगस बियाणे, खते, किटकनाशके विक्रीच होऊ शकत नाही. आता तरी शेतकरी सर्वच दृष्टीने नाडवला जात आहे. खरी गरज आहे हे ती सर्व थांबवण्याची व शेतकऱ्याला या फसवणुकीच्या चक्रव्युहातून बाहेर काढण्याची अन्यथा शेतकरी व शेती जर टिकली नाही तर देश हा देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आता तरी हत्तीचे बळ असलेल्या कृषी विभागाने जागे व्हावे व शेतकऱ्याप्रती व शेतकरी धोरण राबविण्याप्रती एकनिष्ठता ठेवावी अशी अपेक्षा. खासदार अमर शरदराव काळे यांनी व्यक्त केली.








