देशात पाण्याची नव्हे तर नियोजनाचा अभाव; हायवे ग्रीड, पॉवर ग्रीड प्रमाणेच ‘वॉटर ग्रीड’ची गरज- नितीन गडकरींनी संगितला पाणी टंचाईवर उपाय

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : विदर्भात शेतकरी आत्महत्या पाण्याच्या कमतरतेमुळे होत आहे. देशातील काही भागात मुबलक पाणी आहे, तर काही भागात दुष्काळ सारखी स्थिती आहे. किंबहुना, देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव आहे. अशी खंत व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या टंचाईबाबत भाष्य केलं आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्त नागपुरात ‘जलसंवाद आणि जलक्रांती परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. त्या प्रसंगी बोलताना नितीन गडकरींनी या विषयी भाष्य केलं आहे.

मागील २५ वर्षात आमच्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने विदर्भात भक्कम काम केले आहे. १७ मे आणि १८ मे रोजी नागपुरात जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित केली आहे. यामध्ये नाना पाटेकर, आमिर खान, मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांसह जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे देशभरातील तज्ञ सहभागी होतील. देशात जशी हायवे ग्रीड आहे, पॉवर ग्रीड आहे, त्याच पद्धतीने ‘वॉटर ग्रीड’ करणे ही आवश्यक आहे. जिथे पूर येतात तिथून मोठे कॅनल करून पाणी दुर्भिक्ष्य असलल्या भागात आणण्याच गरज आहे. त्यासाठीचे मोठेप्रकल्प सरकारने करावे, मतदारसंघपातळीवर लोकप्रतिनिधींनी त्यांच्यापातळीवर काम करावे, तर गावांनी त्यांच्या पातळीवर जलसंधारणला लोकांची चळवळ बनवावे. लाखो प्रयत्न होतील, तेव्हा पाण्याच्यादुर्भिक्षाचे प्रश्न सुटेल. असेही नितीनगडकरी म्हणाले.

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारीसंस्था गेले २५ वर्ष या क्षेत्रात कामकरत आहे. आम्ही पंजाबराव देशमुखकृषी विद्यापीठाला साडे तीनशे पेक्षाजास्त तलाव बांधून दिले. त्यामुळे त्यांच्या सिंचित शेतीचं प्रमाणवाढलं. तसेच अवतीभोवतीच्यागावांमध्येही भूजल पातळी वाढली.त्या तलावाची खोदलेली मातीआम्ही रस्ते निर्मितीसाठी वापरली. बुलढाणामध्ये ही अशाच पद्धतीचा पॅटर्न वापरून जलसंधारणाचे काम झाले. रस्ते निर्मितीसाठी मातीहीउपलब्ध झाली, आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले. अशी माहितीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *