शेतकऱ्यांच्या फळांसाठी नाविन्यपूर्ण वेंडर मशीन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे व त्यांचे संशोधक विद्यार्थी आदित्य तेजसिंह जगदाळे यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी व शेतातील फळांना योग्य बाजारपेठ मिळावी या उद्देशाने नावीन्यपूर्ण वेंडर मशीनची निर्मिती केली आहे. या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आजपर्यंत वेंडर मशीन केवळ पेय पदार्थ, थंड पाणी यासारख्या वस्तच्या प्रदशन व विक्रीसाठी वापरण्यात येत होती.

मात्र, आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, शेतातील कामातून वेळ न देता त्यांच्या फळाची विक्री व्हावी यासाठी वेंडर मशीन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी जसे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, विमानतळ, दवाखाना, कॅन्टीन, मॉल आदी ठिकाणी फळांनी भरलेली व थंड फळे उपलब्ध होईल अशी वेंडर मशीन शेतकऱ्यांना लावता येणार आहे. या वेंडर मशीनचे महत्त्व शेतकऱ्यांची फळे जसे संत्री, मोसंबी, सफरचंद विविध फळे ग्राहकांना स्पष्टपणे दिसेल अशा दर्शनी भागात ठेवता येईल. १८ डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड तापमानात ठेवून ताजी फळे ग्राहकांना उपलब्ध होतील. फळे विकत घेताना नगद पैसे किंवा क्यूआर कोडचा वापर करता येणार आहे.

तरुणपिढी, जनसामान्यांसाठी फळे वेगवेगळ्या सार्वजनिक जागेवर उपलब्ध करून देता येईल, त्यामुळे आजच्या पिढीला थडपय पासून फळाकड वळत स्वतःच आराग्य जपण्यास देखील मदत मिळेल. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना त्यांच्या फळाचा योग्य मोबदला देखील मिळेल. एकदा वेंडर मशीनमध्ये फळे टाकल्यानंतर ८ ते १० तासांनी पुन्हा वेंडर मशीनमध्ये फळे टाकून शेतकऱ्यांचा विक्रीचा वेळ देखील वाचेल.

या मशीनमुळे शेतकऱ्यांची फळे खराब न होता थेट ग्राहकांपर्यंत विकली जाईल. यातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यास या मशीनचा फायदा होईल. शेतकऱ्यांच्या मुले-मुलींना योग्य शिक्षण घेण्यास व त्यांच्या रोजगारासाठी योग्य मार्ग मिळेल, असे संशोधक डॉ. संजय ढोबळे यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षणाचे माहेरघर असून शेतकऱ्यांसाठी संशोधन कार्य करण्यास कटिबद्ध आहे, असे देखील डॉ. ढोबळे म्हणाले. या वेंडर मशीनमध्ये ३ ते ४ कप्पे तयार करता येईल. त्यामुळे यामध्ये ३ त ४ प्रकारची फळ शेतकऱ्यांना ठेवता येणार आहे.

फळे कमी तापमानात ठेवण्याची व्यवस्था मशीनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे फळे खराब न होता ताजी राहील. वडर मशीनची सवय जनतला आहे. पण, त्यातून केवळ थंड पेय व पाणी भरलेली बॉटल घेतल्या जाते. पण, आता आरोग्यासाठी उत्तम ठरणारी व भूक भागविण्यासाठी ताजी फळे या वेंडरच्या माध्यमातून मिळणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांचे जीवन अधिकाधिक सुकर करण्यास मदत मिळेल. विद्यापीठाचे कार्य केवळ शिक्षण देणे नसून शेतकऱ्यांसाठी कार्य करणे असल्याचे या संशोधनाच्या माध्यमातून दिसून येते. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या संशोधनासाठी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल, आयआयएल संचालक डॉ. प्रकाश ईटणकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार यांनी डॉ. संजय ढोबळे व आदित्य जगदाळे यांचे अभिनंदन केले आहे भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधन होत राहील, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *