शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला
मुंबई/प्रतिनिधी एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरूनबैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती,राजू शेट्टी आणि बच्चू कडूएकत्रितपणे परिवर्तन महाशक्तीतिसरी आघाडी करत सक्षम पर्यायदेण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच मराठा आणिओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाचतापताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल,यावरून महायुती आणि महाविकासआघाडीत चढाओढ असल्याचेदिसत आहे. यातच आता लाखो कार्यकर्ते असलेला एक पक्षच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे सांगितलजात आहे.
तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात भारतराष्ट्र समितीची बीजे रोवली. परंततेलंगण येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा दारूण पराभव झाला. महाराष्ट्रात प्रचंड मोठा ताफा घेऊन येऊन के.चंद्रशखर राव यानी जोरदाशक्तिप्रदर्शन केले होते. अनेक नेते,पदाधिकारी आणि लाखोंच्या संख्येकार्यकर्त्यांनी या पक्षात पटापटप्रवेश केले. परंतु, याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आता सगळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकाँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठतारीखही ठरवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठीघडामोड मानली जात आहे.