ग्रामपंचायत निधी मधून क्षय रुग्णांना निक्षयमित्र बनवा- सीईओ जितीन रहमान
वर्धा/प्रतिनिधी केंद्र सरकारने २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून या धोरणाचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आपल्या क्षेत्रातील क्षय रुग्णांना ग्रामपंचायत निधी मधून निक्षयमित्र बनवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केले. आज स्व. सिंधुताई सपकाळ सभागृह जिल्हा परिषद वर्धा येथे टिबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा कार्यक्रमाचे उद्वघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. रा.ज. पराडकर, जिल्हाक्षयरोग अधिकारी डॉ. हेमंतपाटील, जिल्हा कष्ठरोग अधिकारीडॉ. स्वप्नील बेले, डॉ. संजय गाठे,डॉ.संकेत नांदेकर, डॉ. चारुतासुर्यवंशी, वैद्यकीय अधिकारीउपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाक्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटीलयांनी केले.
यावेळी टीबी मुक्तग्रामपंचायत कार्यक्रमावर मार्गदर्शनकेले. केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरणआखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत हा अभियानराबविण्यात येत आहे. टिबीमुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या ग्रामपंचायतींचे व्हेरिफिकेशन करुन पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या जाहीर केली. या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्ह् यात शासकीय अधिकारी, डॉक्टर आदींचा एक रुग्ण सहाय्यता समुह तयार करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये टिबीमुक्त ग्रामपंचायतींसाठी क्षयरागाच निकष पर्ण कलल्या ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला.
यात निकषामध्ये वार्षिक १००० यामध्ये एक किंवा एकापेक्षा कमी (निरंक) रुग्ण असावा, वार्षिक १००० लाकसख्यमध्य कमीत कमी ३० टिबी संशयित क्षयरुग्ण शोधुन त्यांची थुंकी नमुन्याची तपासणी केली. डीएसटी तपासणी झालेली असावी त्याचे प्रमाण ६० टक्के असावे, १०० टक्के निक्षय पोषण योजना व पोषण आहार दिलेला (निक्षय मित्र) असावा अशा ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत. क्षयरोग दुरिकरण करण्यासाठी या टि.बी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमाचा उद्दश आह. यामध्य पात्र ठरलल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टिबीमुक्त असल्यास कांस्य, दुसऱ्या वर्षी टिबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टिबीमुक्त राहिल्यास सुर्वण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वधा जिल्ह्याअतगत २०२३ मध्ये एकुण ४० ग्रामपंचायतींची नवड टिबीमुक्त ग्रामपंचायत म्हणुन करण्यात आलेली आहे. या ग्रामपंचायतीना व निक्षय मित्र, टि. बी. चॅम्पियन, आ. एम. ए. यांना महात्मा गांधी यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्ती पत्रक देउन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाला ४० ग्रामपंचायतींचे सरपंच, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र येथिल कर्मचारी श्री. खोब्रागडे श्री. बाखडे, श्री. सारडे, श्री. सोनटक्के श्री. पुनवटकर, श्री. जगताप यांनी सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे संचालन श्री. सुमंत ढोबळे व आभार प्रदर्शन डॉ. चारुता सुर्यवंशी यांनी केले.