किरणभाऊ ठाकरे देवळी-पुलगांव मतदारसंघात आमदारकीसाठी देणार तगड्या उमेदवारांना जोरदार टक्कर?
किशोर सुरकार –यावेळी देवळी-पुलगांव विधानसभेकरीता देवळी येथील किरणभाऊ ठाकरे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु असून त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे इतर राजकीय पक्षांचे धाबे दणाणले असून किरणभाऊंच्या शेतकरी, सर्वसामान्य वर्ग, विद्यार्थी यांच्या समस्यांना धावून जाण्याच्या प्रसंगी त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याच्या व ा न्याय देण्यासाठी झटण्याच्या सवयीमुळे अल्पावधीतच ते प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे मात्र इतर पक्षांना चांगलाच घाम फुटणार असून आगामी देवळी-पुलगांव क्षेत्रातीलनिवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असल्याचेदिसून येत आहे.
देवळी-पुलगांव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे विद्यमान आमदार रणजीतदादा कांबळे, शिवसेना (शिंदे) गटाचा दावा आणि भाजपाचे राजेश बकाने यांच्या उमेदवारीच्या रस्सीखेचामुळे उत्सुकता निर्माण झालेली असतांनाच युवा संघर्ष मोर्चाचे किरणभाऊ ठाकरे यांच्या उमेदवारीच्या चर्चे ने चांगलीच खळबळ निर्माण झालेली असून नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा रंगतांना दिसत आहे. तसेच त्यांच्या उमेदवारीमुळे इतर पक्षांना ही निवडणूक मात्र जड जाणार असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. किरणभाऊ ठाकरे यांच्या सामाजिक कार्यातील सहभाग, अन्यायाविरुद्ध लढा देण्याची वृत्ती, विशेष करुन शेतकरी यांच्या विविध समस्यांविरुद्ध वारंवार आवाज उठवून प्रशासनाला धडा शिकविण्याच्या त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे ते या भागातील देवळी शहरासह ग्रामीण भागात सुद्धा अल्पावधीतच लोकप्रिय ठरले आहेत. तर आता निवडणुकीत उभे राहण्याच्या चर्चेने सर्वसामान्यांमध्ये एक नवीन अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा चेहरा दिसत असल्याने मतदारांमध्ये आपल्या क्षेत्रातील समस्या सोडविणारा एक नेता आपल्याला मिळू शकतो असेच चर्चेमधून जाणवत आहे.
त्यांनी केलेल्या कार्यामुळे कोरोना काळातील काम- किराणा किट वाटप, ऑक्सिजन सिलेंडर, गाव तिथे विलगिकरन कक्ष, भिडी येथील पुलाकरिता अर्धदफन आंदोलन, घरकुल लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे मागणिकरिता अनेक आंदोलने, यामध्ये धरणे आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, मोर्चे, राहूटी आंदोलन करण्यात आले. वरच्या माळ्यावर स्थलांतरित केलेले नगर परिषद कार्यालय तळमजल्यावर आणण्यासाठी सतत ७५ दिवस नगर परिषदेसमोर केलेले बेमुदत उपोषण, भिडी येथील विद्यार्थ्यांकरिता थेट कळंब येथे जावून आंदोलन, केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यासंदर्भात शेतकरी संवाद यात्रा. ग्रामिण भागात शेतकरी संवाद यात्रा काढून शेतकऱ्यांमध्ये अन्यायकारक कृषी कायद्याविषयी जनजागृती केली.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात थेट दिल्ली येथील सिंघु बॉर्डर गाठून सहकाऱ्यांसह सहभाग व संयुक्त किसान मोर्चाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्यांना संबोधन, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी या मागणिकरिता जिल्ह्यातील एकमेव तहसील कार्यालयावर शेतकरी धडक मोर्चा. बस स्थानक देवळीचे पाच वर्षापासून रखडलेले बांधकाम त्वरित सुरू करण्याच्या मागणिकरिता बसस्थानक च्या आवारात चिखलात बसूनचिखलफेक आंदोलन, दुसऱ्याच दिवसापासूनअविरत बसस्थानकाचे बांधकाम सुरू, पालकत्व गमावलेल्या मुलींचा इयत्ता १२ वी पर्यंत शैक्षणिकखर्चाची जबाबदारी उचलण्यात आली. दरवर्षी त्यामुलींच्या पालकांना १०००० ची मदत, आगीमुळे घरातील सर्व सामान जळल्यामुळे उघड्यावरपडलेल्या परिवाराला ११००० व किराणा किट, गादी चादरसह इतर साहित्याची पिडीत कुटुंबाला तात्काळ मदत, बोरगाव आलोडा रोडवरील पुलाचेबांधकाम त्वरित व्हावे याकरिता आंदोलन, बायपासने जाणाऱ्या बसेस देवळी बसस्थानकावर याव्या याकरिता सतत पाठपुरावा. देवळी ते दिघी बोपापुर रोडवरील नादुरुस्त पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करण्याच्यामागणिकरिता जलसमाधी आंदोलनाचा इशारा.त्यामुळे त्वरित नविन पुलाचे बांधकामास सुरुवात.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना ओलित करण्यासाठीआठवडाभर दिवसा वीजपुरवठा मिळावा यामागणीसाठी विद्युत वितरण कपनीच्या कार्यालयावरशेकडो शेतकऱ्यांसह धडक.
जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याचा मागणिकरिता शेतकऱ्यांचाविराट मोर्चा. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय व पिकविमा कंपनीकडून त्वरित मदत मिळावी याकरिता तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचाअर्धनग्न मोर्चा. दुसऱ्याच दिवसांपासून नुकसानग्रस्तपिकांचे पंचनामे सुरू. युवा संघर्ष मोर्चाचे दबावामुळे जिल्ह्यात फक्त देवळी तालुक्यात पिकविमा कंपनीने स्वीकारले ऑनलाइन तक्रार अर्ज, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचाफायदा होणार. रब्बी हंगामाची जिल्ह्यात सर्वाधिकमदत ४ कोटी २८ लाख ९५ हजार एवढी मदत देवळीतालुक्याला युवा संघर्ष मोर्चाच्या पाठपुराव्यामुळे मिळवून देण्यात आली. देवळी तालुक्यातील विविध गावातून शेतकरी संघर्ष यात्रा काढली, यात्रेचा समारोप हजारोशेतकऱ्यांच्या उपस्थितीत देवळी येथे जाहीर सभेनेझाला. या सभेकरिता शेतकरी नेते रविकांत तुपकरयांची प्रमुख उपस्थिती. त्यांनी दिली शेतकऱ्यांना एकजूट होण्याची शपथ. त्यांच्या याच कार्यामुळे सर्वसामान्यांप्रतीसमर्पणाची भावना यामुळे त्यांच्या उमेदवारीला सर्वस्तरांतून बळ मिळत असून देवळी-पुलगांव मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीच्या शक्यतेनेनागरिकांमध्ये विशेष आनंद झालेला दिसूनयेत आहे.