निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

आर्वी/प्रतिनिधी निम्न वर्धा प्रकल्पातून तब्बल ५०५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती कली जाणार आहे. या तरगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्याच्या महानिर्मिती आणि केंद्राच्या सतलज जल विद्युत निगम लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. निम्न (लोअर) वर्धा प्रकल्प नजिकच्या वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर आहे. यावर प्रस्तावित तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने व्यवहार्यता सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार ७३२ हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे. विकासकामांसाठी ३०३० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती १०५१.२८ दशलक्ष युनिट्स अपेक्षित असून ३६ महिन्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

तरंगता सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सारऊजा निर्मितीला चालना मिळेल. नूतनीकरण योग्य बंध पूर्ण करण्यास, सौरऊर्जा प्रकल्प स्थापित क्षमतेचे आणि निर्मितीचे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सजन कमी करण्यास सहाय्यभत ठरणार आहे. यातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल. प्रस्तावित ५०५ मेगावॅटच्या क्षमतेला लक्षात घेत, वार्षिक सीओ२ उत्सर्जन जवळपास आठ लाख ६२ हजार ४९ टन कमी होईल. वार्षिक कोळशाचाही वापर आठ लाख ४९ हजार ४३४ टनाने कमी होण्यास मदत मिळेल. प्रकल्पात ४९ टक्के सहभाग सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि ५१ टक्के सहभाग महानिर्मितीचा राहणार आहे. या करारावर गुरुवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. करार करताना महानिमिती आणि सतलज जल विद्युत निगम लिमिटेड, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.