निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोरपणे पालन करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
वर्धा/प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन निवडणुक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे या वेळी अधिक जबाबदारीने पालन करुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एक दिवसाचे प्रशिक्षण निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन सभारंभात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले बोलत होते.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, आर्वीचे उपविभागीय विश्वास शिरसाट, हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपत, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, सावनेरचे उपविभागीय अधिकारी संपट खलाटे, गोंदियाचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, अधिक्षक अनिकेत सोनवने, जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीसंदर्भात विविध प्रकारच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. या सूचना संदर्भात कोणाला शंका असल्यास त्या संदर्भातील समाधान हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या जाते. तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेता निवडणूक विभागातर्फे संकेतस्थळावर येणाऱ्या सूचना व त्याची अंमलबजावनी सर्वांनी दक्षतेने करावी, असे श्री.कर्डिले यांनी स्पष्ट केले.
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडन्यासाठी नेमन दिलली कामे समन्वयाने पारदर्शकपणे पार पाडावी असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत यांनी केले एकूण पाच सत्रामध्ये हे प्रशिक्षण देण्यात आले. यात उप जिल्हाधिकारी प्रियांका पवार यांनी उमेदवारी अर्ज पडताळणी, माघार, निवडणूक चिन्ह आदिबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी वंदना संवरंगपते यांनी निवडणूक व्यवस्थापन व नियोजन यावर मार्गदर्शन केले, उपविभागीय अधिकारी संपट खलाटे, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, अनिकेत सोनवणे यांनी विविध बाबींवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाला सर्व क्षेत्रिय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, निवडणूक विषयक कामे करणारे अधिकारी व कमचारी असे एकुण ३०० अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसिलदार अतल रासपायल यांनी केले.