सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या

वर्धा/प्रतिनिधी महामार्गावरील वाहने अडवून दरोडे टाकणाऱ्या दहा आरोपींच्या टोळीस थेट छत्तीसगडपयत पाठलाग करीत बड्यठोकण्यात आल्या.दरोडेखोरांनी यापूर्वीकेलेल्या गुन्ह्यांबाबत मिळालेली माहितीधक्कादायक आहे.

या प्रकरणात सर्वप्रथमअमरावती येथील मोहम्मद अजीम यांनी तक्रार केली होती. ते भंडारा येथून रेतीचा टक घवून ७ सप्टबरला रात्री अमरावतीसाठनिघाले होते. वाटेत पुलगाव येथे त्यांना रोडवर प्रकाश दिसून आला. ट्रक थांबताच अनोळखी काही व्यक्ती हातात काठ्या घेवूनधमकावू लागले. बाजुच्या शेतात मोहम्मद अजीम व त्यांच्या सहकाऱ्यास मारहाणकेली. पैसे हिसकावले व ट्रकची डिझेल टँक तोडून १०० लिटर डिझेल कॅनमध्ये भरून त्यांनी पळ काढला. याची गंभीरदखल घेत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी विशेष चमू गठीत केल्या. पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी घटनास्थळावरपाहणी केल्यावर डिझेलने भरलेल्या वकाही रिकाम्या कॅन दिसून आल्या. या कॅन उस्मानाबाद येथील असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान अमरावती महामार्गावरीलतळेगाव दशासरदरम्यान असेच गुन्हेघडल्याची माहिती मिळाली.