उत्साही वातावरणात सावंगी येथे श्रीगणेशाची स्थापना सद्भावना व सेवाकार्याची परंपरा दीर्घकाळ चालावी- दत्ता मेघे

वर्धा/प्रतिनिधी सर्वांचे भले व्हावे याच भावनेतून आजतागायत या संस्थेची वाटचाल झाली आहे. संस्थेद्वारे आयोजित गणेशोत्सवातही सर्वांप्रती सामाजिक, सांस्कृतिक सद्भाव आणि आरोग्यसेवेची परंपरा सातत्याने जोपासली असून ही परंपरा दीर्घकाळ चालावी, असा मानस कुलपती दत्ता मेघे यांनी सावंगी येथे श्रीमती राधिकाबाइ मेघे स्मृती ट्रस्टचा गणेशोत्सव तसेच दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.

विद्यापीठाच्या सभाकक्षात आयोजित या परिषदेत प्रारंभी अभिमत विद्यापीठाचे महासंचालक डॉ. राजीव बोरले, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर,संस्कृतिक महोत्सव संयोजक डॉ. आशिष अंजनकर यांनी विद्यापीठाच शैक्षणिक प्रगती, गणेशोत्सवाची तीन दशकांची वाटचाल, विद्यार्थ्यांचेविविध सांस्कृतिक कार्यक्रम,मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाकारण्याची स्पर्धा, परिसरातील नागरिकांसाठी आयोजित सांस्कृतिककार्यक्रम, आरोग्य शिबिरे,जनजागृतीपर उपक्रम याबाबतमाहिती दिली.

या पर्यावरणीय गणेशोत्सवात सकाळी हिरवेपण ल्यालेल्यासभामंडपात श्वेतांबर धारण केलेल्याश्रीगणेशाची प्रतिष्ठापना कुलपतीदत्ता मेघे व शालिनीताई मेघेयांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी, गणमान्य नागरिकांचीतसेच शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वृंदाची उपस्थिती होती. या गणेशोत्सवातील अत्यंत सुबक व रेखीव अशी नऊ फुटांची गणेशमूर्ती संस्थेतील मूर्तिकार सुनील येनकार यांनी मातीपासून साकारलेली आहे. संपूर्ण परिसरात हिरवाई पसरलेली असून नेत्रदीपक रोषणाई, सप्तरंगी कारंजे लक्ष वेधून घेत आहेत. या गणेशोत्सवात नागरिकांकरिता ज्ञानविज्ञान आरोग्य प्रदर्शनातून जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.