कठीण प्रसंगी केन्द्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- माजी खासदार रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. गामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झाला. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. आजही बळीराजाच्या जीवनात त्यांच स्थान कायम आहे. नैसर्गिक संकटाने शेतक-यांची पाठ सोडलेली नाही.

खरीप हंगामातील पिकांचा पेरा होताच सुरु झालेले संकट अद्यापही कायम आहे. असे असले तरी शेतक-यांनी या सर्व संकटाला बाजूला सारुन पोळा सण उत्साहात साजरा केला आहे. केन्द्र सरकारच्या वतीने कठीण प्रसगात शेतक-यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्यसरकारच्या वतीने नमो सन्मान निधीच्या माध्यमातुन आर्थीक मदत करीत आहेे, या कठीण प्रसंगी केन्द्र सरकार व राज्य सरकार सर्व शेतक-यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन माजी खासदार ठरावरी ढरवरी रामदास तडस यांनी पोळा उत्सव कार्यक्रमात केले. देवळी शहरात एकच बैल पोळा भरविण्याची परंपरा आजही कायम आहे.

मिरणनाथ मंदिर पटांगणात आयोजित बैल पोळ्याचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होती. तसेच अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष सौ. शोभा रा.तडस, माजी नप उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, माजी नप सभापती नंदू वैद्य व विविध कार्यकारी सेवा सहकारीचे अध्यक्ष शरद आदमने, रवी कारोटकर, मारोतराव मरघडे, हरिदास ढोक यांची उपस्थिती होती. यावेळी बैल सजावट कमिटीच्या वतीने सवोत्तम पाच बैल जोड्यांची गुणानुक्रमे निवड करण्यात आली. माजी खासदार रामदास तडस च्या वतीने उत्कृष्ण बैल जोडी प्रथम पुरस्कार विठ्ठलराव, सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा देवळीच्या वतीने उत्कृष्ट बैलजोडी व्दितीय पुरस्कार प्रफुलराव तेलरांधे, देवळी विविध कार्यकारी संस्था च्या वतीने उत्कृष्ट बैल जोडी तृतीय पुरस्कार मोहणराव जबडे, व महालक्ष्मी बहु. सामाजिक व शैक्षणिक संस्था देवळीच्या वतीने चतुर्थ क्रमांक अविनाश मरघाडे, सौ. शोभा रा. तडस, सचिव श्री. रामदासजी तडस खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या वतीने पाचवा पुरस्कार गणेशराव तिवारी या सर्व बैल जोड्यांना चषक व रोख पारितोषिक देऊन मा.खासदार रामदास तडस व अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

बैलांचा उत्कृष्ट बांधा, रंग, तसेच सजावटीच्या आधारे या बैलांची गुणानुक्रमे निवड करण्यात आली. तसच तसेच या बल पाळ्यात उपस्थित असलेल्या उपस्थित प्रत्येक बैल जोडीला मा. खासदार रामदास तडस यांचे वतीने रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी माजी उपाध्यक्ष. डॉ. नरेंद्र मदनकर, देवळीचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शरद आदमाणे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, तर संचालन रवी कारोटकर व उपस्थितांचे आभार श्यााम घोडे यांनी मानले. कार्यक्रमाला देवळी विविध सहकारी सोसायटीचे प्रकाश कारोटकर, संतोष मरघाडे, सुनिल पिपरे, किसनाजी उगेमुगे, वसंत तरास, नितीन बकाने, श्रीकांत येनुरकर, शंकरराव बेन्डे, गणपत पिपरे, संजय पारीसे, रमेश सातपुते,सुरेश रवेतकर, धनशाम लाकडे,, स्वप्नील लाकडे, सुरज कानेटकर,राम खोंड, विजय चौधरी, राजू झिलपे, विक्रम वैद्य, सौरभ कडू, उमेश कामडी, नितीन भजभूजे,सचिन समर्थ, शंकरराव बेंडे, अमनतडस, तजस कड, विनोद तेलरांध्यनाना दूरगुडे, अंकित टेकाडऋषभ कारोटकर, जे. पी. गोबाडे,राजू इटनकर, उगेमुगे, गणपतराव पिपरापुरे, प्रकाश देशमुख, संजय पारिसे, आयुष आंबटकर, अमोलइंगोले, रोशन पाटणकर,व देवळी येथील मोठ्या संख्येने शेतकरीबांधव उपस्थित होते.