मेघे अभिमत विद्यापीठाचा सांस्कृतिक महोत्सव आज “स्वरवैदर्भी’सिनेगीत गायन स्पर्धा

सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त शनिवार, दि. ३१ रोजी विदर्भातील युवा गायकांसाठी’स्वरवैदर्भी’ हिंदी सिनेगीतगायन स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे. यास्वरचाचणी स्पर्धेतून महाअंतिम स्पर्धेसाठी १५ ते ३५ या वयोगटातील १२ स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे.

या बाविसाव्या विदर्भस्तरीय सिनेगीत स्पर्धे चे उद्घाटन सकाळी ९ वाजता सावंगी (मेघे) येथील शरद पवार दंत महाविद्यालयाच्या व्याख्यान कक्षात अभिमत विद्यापीठाचे महासंचालक डॉ. राजीव बोरले यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक डॉ. आशिष अंजनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या प्राथमिक फेरीत युवा स्पर्धक हिंदी चित्रपट गीते सादर करतील. या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या १२ गायकगायिकांची महाअंतिम स्पर्धा मेघे अभिमत विद्यापीठाच्यासांस्कृतिक महोत्सवातील सायंकालीनसांस्कृतिक कार्यक्रमात होणार आहे.

विजेत्यागायकगायिकांना स्वरवैदर्भी सन्मानचिन्हासहप्रथम २२ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय ११हजार आणि उर्वरित स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ३ हजार असे एकूण ७५ हजार रुपयांचेरोख पुरस्कार देण्यात देण्यात येणार आहे. संगीतप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून नव्या पिढीतील गायकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन स्वरवैदर्भीचेसंयोजक तथा संस्थेचे विशेष कार्य अधिकारीसंजय इंगळे तिगावकर, सहसंयोजक अभय जारोंडे, सुनील रहाटे यांनी केले आहे.