मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी येत्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे व आगामी काळात येणा-या निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करुन राष्टीय कार्यात मदत करावी. तसेच राजकीय पक्षांनी आपले स्तरावरुन नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करावे. व राष्ट्रीय उपक्रमास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. आगामी वर्ष हे निवडणूकांचे वर्ष असल्याने दि.१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यानुसार ८ वर्धा लोकसभा मतदार संघातंर्गत आर्वी, देवळी, हिंगणघाट व वधा मतदार सघाची मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी आज प्रसिध्द करण्यात आली असून मतदारांनी माहितीसाठी सदर यादी मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पत्रकार परिषेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अनील गावीत, निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार अतुल रासपायले उपस्थित होते.

आज दिनांक ३० ऑगस्ट प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम यादीनुसार आर्वी विधानसभा मतदार संघात १ लाख ३२ हजार ६४७ स्त्री मतदार, १ लाख ३० हजार १०८ पुरुष मतदार असे एकुण २ लाख ६२ हजार ७५५ मतदार आहे. देवळी विधानसभा मतदार संघात १ लाख ३७ हजार ४७१ स्त्री मतदार, १ लाख ३४ हजार २९६ पुरुष मतदार व इतर २ असे एकुण २ लाख ७१ हजार ७६९ मतदार आहत. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात १ लाख ५० हजार ४९८ स्त्री मतदार, १ लाखा ४४ हजार १३० पुरुष मतदार व इतर १ असे एकुण २ लाख ९४ हजार ६२९ मतदार आहेत. वर्धा विधानसभा मतदार संघात १ लाख ४५ हजार ६४७ स्त्री मतदार, १ लाख ४४ हजार ५९९ पुरुष मतदार व इतर १२ मतदार असे एकुण २ लाख ९० हजार २५८ मतदार आहेत.

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात ५ लाख ६६ हजार २६३ स्त्री मतदार, ५ लाख ५३ हजार १३३ पुरुष मतदार व १५ इतर मतदार असे एकुण ११ लाख १९ हजार ४११ मतदार आहेत. मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त मतदारांचे नाव नोंदविण्यासाठी चारही विधानसभा मतदार संघतील मतदान केंद्रांवर दि.१०, ११, १७व १८ ऑगस्ट या सुट्टीच्या दिवशी विशेष शिबिराचे आयोजन करुन मतदार नोंदणी करण्यात आली. तसेच या कालावधीत भटक्या, विमुक्त जमातीच्या व असुरक्षित आदिवासी गट समाजाची गावामध्य विशष शिबिराच आयाजन करुन मतदार नोंदणी करण्यात आली.

यामध्ये ८५ गावांमधील ४ हजार ३३० मतदार असून नविन १०८ मतदार नोंदणी करुन घेण्यात करण्यात आली. जिल्ह्यातील कोलाम समाजाची एकुण ९ हजार १९२ मतदार नोंदणी करण्यात आली असल्याचे यावेळी राहुल कर्डिले यांनी सांगितले. तसेच ८ हजार ७६२ दिव्याग मतदारांनी त्यांचे नावासमोर मदार यादीमध्ये दिव्यागत्वाची नोंद केली. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या शिबिरात १ हजार ६३४ नवमतदारांनी मतदार यादीत नावाची नोंद केली.

दि.१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकवरील प्रारुप मतदार यादी नुसार एकुण मतदाराच्या तुलनेत दि. ६ ऑगस्टपर्यंत १८ ते १९ वयोगटातील २० हजार १७८ मतदाराची व २० त २९ वयागटाती१ लाख ९३ हजार ९१८ मतदारांची नोंदणीकरण्यात आली. तर दि.३० ऑगस्ट पर्यंत१८ ते १९ वयोगटातील २४ हजार ४७७ मतदाराची व २० ते २९ वयोगटातील २ लाख १ हजार २७१ मतदारांची नोंदणी करण्यात आली. समाविष्ट केलेले मतदार : प्रारुप मतदारयादीनुसार दि.६ ऑगस्ट पर्यंत २२ हजार ४६९ मतदाराचा समावश करण्यात आलतर अंतिम मतदार यादीनुसार दि.३० ऑगस्ट पर्यंत १९ हजार ६९१ मतदाराचा समावेश करण्यात आला. कमी केलेले मतदार : प्रारुप मतदार यादीनुसार दि.६ ऑगस्ट पर्यंत २ हजार १०६ मतदार वगळन्यात आले आहेत तर दि.३० ऑगस्ट पर्यंत २ हजार १९९ मतदार वगळन्यात आले आहे.