“निराश अन् भयभीत झाले…’, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ूंचा संताप

नवी दिल्ली/प्रतिनिधी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डाक्टरची बलात्कारानतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, बंगालमध्ये भाजपने सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. दरम्यान, आता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांनीदेखील या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ही घटना अतिशय वेदनादायक आणि भयावह आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पीटीआयशी बोलताना द्रौपदी मुमर्ू म्हणाल्या की, बसं आता खूप झालं… कोणताही सुसंस्कृत समाज महिलांवर असे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला ‘प्रामाणिक, निःपक्षपाती आत्मनिरीक्षणाची’ आणि स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची गरज आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. निर्भयाच्या घटनेनंतर आपल्याला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसते. राष्ट्रपती पुढे म्हणतात, त्या प्रकरणानंतर १२ वर्षात असंख्य बलात्कार झाले, ज्यांना समाज विसरला आहे. आता भारताला इतिहासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या संकटाचा आपण सर्वसमावेशकपणे सामना केला पाहिजे. कोलकातामध्येविद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत असतानाही गुन्हेगार कुठेतरी लपून बसलेआहेत, अशी प्रतिक्रिया मुमर्ू यांनी दिली.