एसटी बँकेची नोकर भरती तातडीने रद्द करा; चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपर निबंधकांनी दिले महामंडळाला पत्र

वर्धा/प्रतिनिधी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक, लि. मुंबईने डहॉक व तात्पुरत्या पद्धतीने केलेली अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती ही योग्य व विहित पद्धतीने केली नाही. त्यामुळे ही नोकर भरती त्वरित रद्द करण्याबाबतचे पत्र पुणे येथील सहकारी संस्थांचे अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट बँकचे अध्यक्ष तथा महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे. या पत्रामुळे एसटी महामंडळाच्या वतर्ुळात खळबळ उडाली आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या नवीन संचालक मंडळाने बँकेत केलेल्या बेकायदेशीर नोकरभरतीबाबत विविध सघटनानी तकार कली हाती. त्या तकारीची चौकशी करण्यात आली.

चौकशीअंती जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग -१, सहकारी संस्था, मुंबई यांनी १५ जुलै रोजी चौकशी अहवाल सादर केला. त्या अहवालात स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक लि. मुंबई या बँकेने डहॉक व तात्पुरत्या पद्धतीने केलेली अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती योग्य व विहित पद्धतीने केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती त्वरित रद्द करण्यात यावी, असे पत्र सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणेचे अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांनी १३ ऑगस्टला दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची आणि एसटीकर्मचाऱ्यांमार्फत चालविली जाणारीपगारदारांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्हबँक लि. ही सहकारी संस्था १९५३ पासून कामगारांना आर्थिक दिलासा देण्यासाठीकार्यरत आहे.

जून २०२३ मध्ये एसटीबकच्या निवडणकीत सत्तातर झाल. त्यानतर बँकेच्या कारभाराविषयी एसटी कामगार सेनेने ४ फेब्रुवारी २०२४ रोजी निवेदन देऊन नोकर भरतीच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने ४ जुलै २०२४ रोजी निवेदन देऊन बँकेच्या संचालक मंडळाच्या बेकायदेशीर व अन्यायी वर्तनाविरोधात आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी एसटी कामगार सेनेने नोकर भरती प्रक्रियेस तातडीने स्थगिती देण्याची मागणीही केली होती, असे सरचिटणीस हिरन रडकर यानी सांगितले.