बाजार समितीला दर्जेदार करण्यासाठी ॲड. कोठारी आदर्श प्रशासक- अनिल देशमुख

हिंगणघाट/प्रतिनिधी हिंगणघाट बाजार समिती ही राज्यात एका उत्तम दर्जाची आदर्श बाजार समिती म्हणून नावारुपाला येण्यासाठी ॲड. सुधीर कोठारी यांचे अभ्यासू व संयमी नेतृत्व कारणीभूत आहे. ही बाजार समिती राबवित असलेल्या योजना आज राज्यात आदर्शवत ठरल्या आहे, असे गौरवोद्गार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले. ते ४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे १ हजार शेतकर्यांना ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात आलेल्या झटका बॅटरी कार्यक्रमाच्या वाटपप्रसंगी बोलत होते.

अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी तर प्रमुख अतिथी म्हणून आ. समीर कुणावार, माजी आ. राजू तिमांडे, राकाँचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, आफताब खान, हरीश काळे, नपं अध्यक्ष योगिता तुळणकर, वामन चंदनखेडे, दिगांबर चांभारे, राजू भोरे, सुरेंद्र कुकेकार, भाजपा जिल्हा महासचिव आकाश पोहाणे, विनोद विटाळे, पंढरी कापसे, निलेश ठोंबरे, अशोक रामटेके, नगरसेविका माया जीवतोडे, बाजार समितीचे संचालक मधुकर डंभारे, आदींची उपस्थिती होती. शेतकरी हितासाठी ही बाजार समिती टिकली पाहिजे या उद्देशाने या बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांच्या समवेत असल्याचेे आमदार समीर कुणावार म्हणालेे. या बाजार समितीच्या कोल्ड स्टोअरेजसाठी आपण राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहून बाजार समितीची भरभराट व्हावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे ओशासन त्यांनी दिले.

माजी आ. राजू तिमांडे यांनी बाजार समिती मधून शेतकर्यांना मिळत असलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी या बाजार समितीने २३ वर्षात केलेल्या कामांची माहिती देऊन ७० कोटीवरून २३०० कोटींच्या वार्षिक उलाढालीसाठी प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सर्व घटकांना सोबत घेऊन ही बाजार समिती काम करीत असल्याचे ॲड. कोठारी यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक मधुसुदन हरणे, समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर, माजी संचालक शेषकुमार येरलेकर, पं.स. माजी सभापती गंगाधर कोल्हे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन दीपक माडे तर आभार प्रदर्शन बाजार समितीचे उपसभापती हरीश वडतकर यांनी केले. कार्यक्रमाला शांतीलाल गांधी, जनार्दन हुलके, महादेव बादले, अरुण बकाल, गणेश वैरागडे, नगरसेवक धनंजय बकाने, प्रकाश राऊत, संजय चव्हाण, अनिल भोंगाडे, राजेश धनरेल, सचिन तुळणकर, लिलाधर मडावी, आदींची उपस्थिती होती.