हिंगणघाटेत उमेदवारीची धुमश्चक्री! पक्षांत बंडखोरीचा ज्वालामुखी फुटणार!

प्रणय बालपाड/द.जन-सगाम हिंगणघाट : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाटात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांची नेत्यांच्या घरी अक्षरशः झुंबड उडाली असून, तिकीट मिळवण्यासाठी सुरू असलेल्या राजकीय चढाओढीने शहराचे वातावरण चांगलेच तापवले आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काग्रेस (अजित पवार गट), शिवसेना आणि काँग्रेस या सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

प्रत्येक गटात नाराजी, मतभद आणि गटबाजीचं वादळ उठलं आहे. तिकीट वाटपाच्या आधीच पक्षांत अंतर्गत स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिकीट न मिळाल्यास अनेक इच्छुकांनी पक्ष साथ देत नसेल, तर आम्ही अपक्ष म्हणून मैदानात उतरणार! अशी उघड घोषणा केली आहे. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठा आणि गटबाजीअधिक महत्त्वाची ठरतेय, अशीचर्चा राजकीय वतर्ुळात रंगली आहे. हिंगणघाटात सत्तेसाठीचंराजकीय युद्ध रंगायला सुरुवात झाली आहे – आता प्रश्न असा,या स्फोटात कोणाचं राजकारण होणार राख?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *