भारतीय सिंधू सभेचा बघेल यांच्या विधानावर आक्षेप कठोर कारवाईची मागणी
माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, अध्यक्ष किशन नेभनानी, पत्रकार सोनू आर्य, प्रल्हाद मोटवानी यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, २६ ऑटोबर रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथे पत्रकार परिषदेत अमित बघेल यांनी हेतुपुरस्सर सिंधीसमुदायाच्या भावनांचा अपमानकेला आणि सिंधी समुदायाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली.त्यामुळे सिंदी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. बघेल यांनीसिंधी समाजाची जाहीर माफीमागावी तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीमागणी करून बघेल यांच्यावतव्याचा निषेध करण्यात आला.
निवेदन देताना भारतीयसिंधूसभेचे सदस्य व सिंधी समाजाचेविनोद उदासी, संजय बुलानी, पवनसचवानी, अशोक बोधानी, राजेशलखानी, तीरथदास मोटवानी,हिरानंद मोटवानी, दिलीप रहेजा, विक्की तकतानी, सुनील अमलानी,राजेश चंदानी, राजू मिहानी तसेच सिंधी समाजाचे कार्यकर्ते उपस्थितहोते.









