पंतप्रधान मोदी २७ रोजी तीन कोटी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपा २७ जून रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर संवादाचा इतिहास रचणार आहे. पंतप्रधान मोदी १६,००० संघटनात्मक मंडळे आणि १० लाख बूथवर तीन कोटी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल आणि राज्य सरचिटणीस संघटना धर्मपाल सिंग यांनी कार्यक्रमाच्या तयारीसाठी नुकतीच एक आभासी बैठक घेतली. बैठकीला संबोधित करताना सुनील बन्सल म्हणाले की, “मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रम तीन टप्प्यांत केला जाईल. २६ जून रोजी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा भोपाळमध्येच अल्पकालीन विस्तारकांशी संवाद साधतील.

पहिल्या टप्प्यात २७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये अल्पकालिक विस्तारकांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान काही मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवादही साधू शकतात. तिसर्या टप्प्यात “मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर, बूथ स्तरावरही मोदींचे भाषण कथनकेले जाईल. या मोहिमेसोबतचपक्षाचे कार्यकर्ते आपापल्याबूथवर अभेद्य गडाची रचनातयार करण्यात सहभागी होतील, अशी माहिती देऊन ते म्हणाले की, २३ ते ३०जून या कालावधीतघरोघरी संपर्क अभियानआणि “संपर्क सेसमर्थन’ कार्यक्रमांतर्गत प्रत्येक लोकसभामतदारसंघातील एकहजार प्रबुद्ध वर्गाच्यासंपर्काचा अहवाल मध्यवर्तीकार्यालयात पाठविण्यास सांगण्यातयेईल. आतापर्यंत कोणत्याहीराजकीय पक्षाने किंवा संघटनेनेडिजिटल प्लॅटफॉर्मवर इतकामोठा व्हच्यर्ुअल संवाद आयोजित केलेला नाही.