खेळण्याची सवय सुदृढ समाज व राष्ट्र निर्माणासाठी मदतगार- खा. काळे
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुलगांव : मैदानाच्या मातीशी नाळ जोडली असता, खेळाच्या माध्यमातून शरीराला व मनाला सुदृढता प्राप्त होते. कोणताही अविचार मनामध्ये येत नाही. परंतु, याच वेळी व्यसनाधिनतेपासून अलिप्त राहून या मातीशी इमान राखून तिचे पावित्र्य जपल पाहिज. सव विद्यार्थी व युवकांनी दिवसातील एक तास खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवला पाहिज. खेळण्याची सवय सुदृढ समाज व राष्ट्र निर्माण करण्यासाठी निश्चितच मदत करेल, असे प्रतिपादन खा. अमर काळे यांनी केले. वर्धा जिल्हा क्रीडा भारती व गांधीनगर स्पोर्टिंग लब पुलगाव यांच्या संयुत वतीने डॉ. हेडगेवार स्टेडियम येथे वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन मान्यताप्राप्त जिल्हा पुरुष व महिला निवड चाचणी पालकमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खा. काळे बोलत होते.
अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार रामदास तडस, वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर, क्रीडा भारतीचे जिल्हा संयोजक हरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते. क्रीडाज्योत प्रज्वलित केल्यानंतर स्थानिक आर. के. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परिसरामध्ये फिरवून अभिवादन केले. प्रास्ताविक अविनाश भोपे यांनी केले. संचालन गांधीनगर स्पोर्टिंग लबचे अध्यक्ष अजय बोबडे यांनी केले. यावेळी शहरातील राष्ट्रीय खेळाडू रवी साखरे, विनोद बिरे, दिलीप बन्नगरे यांचा सत्कार करण्यात आला. कबड्डीचे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.









