नाचणगावमध्ये आ. बकाने यांचा जनसंवाद

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुलगांव : नाचणगाव येथील राधाकृष्ण नगरातील लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात आ. राजेश बकाने यांनी नागरिकांसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक विकासाशी निगडित प्रश्नांची माहिती घेतली. या सवादादरम्यान परिसरातील नागरिकांनी आ. बकाने यांना आपल्या समस्या मोकळेपणाने सांगितल्या. आ. बकाने यांनी तत्काळ प्रतिसाद देत अनेक विषयांवर प्रशासनाशी समन्वय साधून उपाययाजना करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी परिसरातील लाडक्या बहिणींनी आ. बकाने यांचा ओवाळून सत्कार केला. यावळी आ. बकान म्हणाल की, जनतेचा विश्वास आणि प्रेम हीच आपली खरी ताकद आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण केवळ विकासकामांसाठी नाही तर प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमी उपलब्ध राहणार आहे.

राधाकृष्णनगर आणि नाचणगाव परिसराचा सर्वांगीण विकास ही आपली जबाबदारी आणि वचनबद्धता असल्याचे आ. बकाने म्हणाले. या संवाद कार्यक्रमाला राहुल चोपडा, किशोर गव्हाळकर, विनोद माहुरे, गजानन राऊत, अरविंद नागतोडे, प्रल्हाद कैकाडी यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक, तरुण आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी जयश्री मोकदम, सुषमा ओंकार, सुलोचना चांदोरे, ज्योती चांदोरे, अरुणा वैद्य, कांता घायवट, शालू वाढवे, ज्योती विंतोडे, वृषाली तिखे, मोनेलाई या बहिणींनी आत्मीयतेने केलेल्या स्वागतामुळे वातावरण भावनिक झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *