दीपोत्सव सोहळ्याने झळाळला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : वर्धा विभाग मोहीम तर्फे एक दिवा शिवभक्तांचा व शिवकन्यांचा या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही दीप उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साह, देशभक्ती आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडली. कायक्रमाला प्रमख पाहुणे म्हणून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, वर्धा विभाग मोहीमचे संस्थापक प्रतीक पवार व दुष्यंत ठाकरे मित्र परिवारचे अध्यक्ष दुष्यंत ठाकरे यांची उपस्थिती होती. ज्या भूमीने स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या जनतेच्या राजासोबत दिवाळी साजरी करण्याचा हा अनोखा उपक्रम ठरला. या दीपोत्सवाचे आयोजन वर्धा विभाग मोहीम आणि दुष्यंत ठाकरे मित्र परिवारच्या संयुत वतीन करण्यात आल.
वधा विभाग माहीम गेल्या ५ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व संस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत आहे. तसेच दुष्यत ठाकरे मित्र परिवारच्यवतीनेही शैक्षणिक व सामाजिककार्यात मदत होते. गरजू रुग्णांना नियमित रत पुरवठा, गरजू शाळकरी मुलांना पुस्तक व शालेय साहित्यांचे वाटप, गरजंनअन्न वाटप असे विविध उपक्रम राबविले जातात. या सोहळ्यात विविध नामवंतसंस्था, सामाजिक संघटना तसेच स्थानिक राजकीय मान्यवरांनी सहभाग नोंदवकार्यक्रमाची शोभा वाढवली. हजारोदिव्यांच्या प्रकाशात छत्रपती शिवाजीमहाराज की जय, या जयघोषांने संपूर्णचौक दुमदुमला. या दीपोत्सवाचा उद्देश नव्या पिढीपर्यंतशिवचरित्राची प्रेरणा आणि सामाजिकएकतेचा संदेश पोहोचवणे हा होता.









