दारूचा महापूर! बिट जमादाराच्या आशीर्वादाने आष्टी तालुक्यात अवैध दारूचा धंदा फोफावला
नरेश भार्गव/दै.जन-संग्राम आष्टी : आष्टी तालुक्यातील साहूर बीट परिसरात अवैध गावठी दारूच कारखाने उघडपणे सुरू असून, या दारूचा पुरवठा तालुक्यातील विविध गावांत मोठ्या प्रमाणात होत आहे. बोरगाव, पंचाळा, पोरगव्हान, धाडी, तारासावगा या गावांतील जंगल भागात दिवस-रात्र दारू गाळण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिट जमादार नंदा गवळी यांच्या आशीर्वादाने हा या दारूचा पुरवठा तालुक्यातील व्यवसाय बिनधास्त सुरू असून, विक्रेत्यांकडून दरमहा हप्ते वसूल केले जातात.
परिणामी, दारूचे व्यसन वाढून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. दारूव्यवसायासोबतच या भागात अवैध जगाराच अड्डही पोलिसांच्या छत्रछायेखाली फोफावत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अवैध धंद्यामुळे शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी नागरिकांत चर्चा आहे. साहूर बीटातील दारू व जुगार व्यवसायावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.









