संकटातही उजळली दिवाळी, आगग्रस्त विधवा महिलेचा संसार पुन्हा उभा
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट : वडनेर येथील मंजुळा दांडेकर या विधवा महिलेच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण घर, कपडे, धान्य, घरगुती साहित्य आणि दैनंदिन वापरातील वस्तू क्षणात जळून खाक झाल्या. रविवारी घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यत करण्यात आली. जीवितहानी टळली असली तरी या घटनेने त्यांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ आ. समीर कुणावार यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. तसेच जीवनावश्यक वस्तू, साहित्य आणि घराच्या पनबाधणीसाठी आर्थिक मदत करून आगग्रस्त विधवा महिलेचा पुन्हा संसार उभा केला. सगळीकडे दिवाळीचा सण साजरा करीत असताना वडनेर येथील मंजुळा दांडेकर या विधवा महिलेच्या घराला रविवार १९ रोजी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. त्यांचा संसार उघड्यावर आला. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळ गाठून मंजुळा दांडेकर या महिलेचे सांत्वन केले. दरम्यान, आमदार समीर कुणावार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रभावित कुटुंबाला धीर देत त्यांनी या कठीण प्रसंगी ते त्यांच्या पाठिशी असल्याचे आश्वासन दिले. आ. कुणावार यांनी तत्काळजीवनावश्यक वस्तू, आवश्यक साहित्यपुरवून घराच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिकमदतही देण्यात आली. मंजुळा दांडेकर या एक विधवा, कष्टाळूआणि आत्मनिर्भर महिला आहे. स्वतःच्या मेहनतीवर संसार उभा करणार्या मंजुळाचा संसार आगीत उद्ध्वस्त झाल्यावर त्यांनादिलेली मदत ही फत आर्थिक नव्हे, तर मानसिक आधारही ठरली. आमदार समीर कुणावार यांनी दाखविलेली ही संवेदनशीलतासमाजसेवेचा नवा आदर्श निर्माण करणारी ठरली आहे. दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे केवळ दिवे लावणे नाही, तर एखाद्याच्या अंधारमय जीवनात प्रकाश आणणे हीच खरी समाजसेवा, हीच खरी दिवाळी, असे मत आमदार कुणावार यांनी यावेळी व्यत केले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.









