गिरडच्या मातीतील कुस्ती पहलवानांचा दमदार डाव

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : दिवाळी पाडव्याला गिरड यथील श्रीराम मदिर दवस्थानातगत हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने गेल्या ११३ वर्षांपासून पारंपरिक कुस्ती आमदंगलाची प्रथा निरंतर आजही कायम आहे. पोलिस ठाण्याच्या मैदानावर आयोजन करण्यात आलेल्या कुस्तीच्या आमदंगलीत गिरडसह आसपासच्या गावातील नामांकित पहेलवानांनी रंगलेल्या या आमदंगलीत दमदार झजींनी मदान गाजवल, तर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात जयघोष करत उत्सवाचा माहोल निर्माण केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिरडचे पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील, बहादुरसिंग अकाली, श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बळवंत गाठे, सचिव संदीप शिवणकर, कोषाध्यक्ष सुधाकर बाकडे, तसेच पत्रकार निर्भय पांडे, रवी गाठे, अरुण मोटघरे, सुभाष चौधरी, साहिल लोढे आणि डॉ. दीपक डडमल उपस्थित होते. स्पर्धे त पहलवानांनी ताकद, डावपेच आणि काशल्याच अप्रतिम प्रदशन करून प्रेक्षकांची मने जिंकली. त

रुणांमध्ये व्यायाम, तंदुरुस्ती आणि पारंपरिक खेळांविषयी आवड वाढावी, या उद्देशाने १९१२ मध्ये श्रीराम देवस्थानचे मठाधिपती सीताराम महाराजांनी चालू केलेली परंपरा ११३ वर्षांपासून अद्यापही जोपासली जात आहे. यंदा गिरडसह सिर्सी, बेसूर, महालगाव, केसलापूर, पिपरा, बेला, सावंगी, वडगाव, हिवरा डोणगाव, हिंगणघाट, दर्यापूर, उमरेड आणि चिमूर येथील पहेलवानांनी सहभाग घतला. गावातील नागरिक आणि परिसरातील प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक कुस्तीचा आनंद घेत प्रत्येक डावावर टाळ्यांचा गजर आणि जयघोष केला. स्पर्धेचे पंच म्हणून डॉ. गोपीकृष्ण थुटे आणि प्रशांत लांडे यांनी कुशलपणे जबाबदारी पार पाडली. यशस्वीतेसाठी विकी सहारे, मंगेश दोडके, सचिन शेळके, वैभव अंडरस्कर, मंथन भांदककर, शंकर उमाटे, सौरभ शेळके, प्रशांत ठाकूर, अनिल गुंडे, संजय आजबेले, तसेच हनुमान व्यायाम शाळेचे सदस्य आणि सोनामाता युवा प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. गिरडच्या मातीत रंगलेल्या या पारंपरिक आमदंगलाने दिवाळी सणाचा उत्साह अधिक वाढवला. कुस्तीची परंपरा, गावातील एकता आणि व्यायाम सस्कती जपणार्या हनुमान व्यायाम शाळेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *