आर्वीतील श्री यंत्र मंदिरात रविवारी दिवाळी पंचमी दीपोत्सवाचे आयोजन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम आर्वी : आर्वी-शिरपूर रोडवरील जगातील एकमेव श्रीचक्र आकाराचे गर्भगृह असलेले श्री यंत्र मंदिर श्री रेणुका देवी मंदिरात दिवाळी पंचमी दीपोत्साचे भव्य आयोजन भतिमय आणि पारंपरिक वातावरणात साजरा होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन रविवार २६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. श्री रेणुका माऊलींच्या साक्षीने सामूहिक दीपप्रज्वलन सोहळ्याने कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून, मंदिर परिसरातील हजारो दीपांच्या प्रकाशात संपूर्ण वातावरण तेजोमय होणार आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने भव्य फटायांची आतषबाजी, विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट, भतिमय डीजे संगीत व पारंपरिक गरबा नृत्य यांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसर फुलांनी, रांगोळ्यांनी व पारंपरिक दिव्यांनी सजविला जाणार असून श्रद्धा व संस्कृतीचा सुंदर संगम साकारला जाणार आहे.

मंदिर समितीच्या वतीने सर्व भतांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भतांनी एक किंवा अधिक पणती (दीप) घेऊन येऊन श्री रेणुका माऊलींच्या चरणी अर्पण कराव्यात. नैवेद्यासाठी आणलेला फराळ, प्रसाद सर्वांना सामूहिक स्वरूपात वितरित केला जाणार आहे. भतांनी स्वतःचे फटाके आणून स्वतः आनंद लुटावा. मात्र, शिस्त, स्वच्छता आणि भतिभाव राखावा. या दीपोत्सवाचा उद्देश केवळ दिव्यांचा नव्हे, तर भती, प्रेम आणि संस्कृतीचा प्रकाश जागविणे हा आहे. या दीपोत्सवाला भतांनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *