मायानगरीला मान्सूनची कायमच प्रतीक्षा

मुंबई/प्रतिनिधी मान्सून केरळात दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात त्याचं कधी आगमन होईल, याबाबत अनिश्चितता आहे. तरीही १५ ते १७ जूनच्या दरम्यान मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होऊ शकते, असा अंदाज आहे. मान्सून केरळात दाखल झाला की मुंबईमध्ये कधी येणार असे वाक्य दरवर्षी आपल्या कानावर पडत े. या ही वर्षी मान्सून रखडणार उशीरा दाखल होणार अशी माहिती समोर येत आहे. तसा आत्तापर्यंतचा मुंबईतील मान्सूनचा इतिहास पाहिला तर मान्सूनचे आगमन मुंबईत कधीच वेळेत झाले नाही. गेल्या दोन दशकातील मान्सून आगमनाच्या तारखा पाहिल्या तर मुंबईत मान्सून हा सरासरी १० जूनपर्यंत मुंबईत दाखल होतो.

केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर कधी चक्रीवदळचा अडथळा तर कधी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून रखडतो. हे सगळे पार झाल्यानंतर मान्सून जरी कोकणात दाखल झाला तरी मुंबईकरांना मात्र वाटपाहावी लागते.त्यामुळे मुंबईत मान्सून हा आतापर्यंत कधीच जूनच्या पहिल्या आठवड्यातदाखल झालेला नाही. गेल्या२० वर्षातील मुंबईतील मान्सून आगमनच्या तारखावर नजरमारल्यास मान्सून हा २००६साली सर्वात लवकर म्हणजे३१ मे रोजी दाखल झाला होता.सर्वात उशीरा मान्सून २०१९साली २६ जून रोजी दाखल झाला आहे.

पावसाचा प्रवास कधीअंदमान, कधी केरळ असार ेंगाळता े तर कधी पश्चिम किनारपट्टीवरून पुढे सरकणारी पावसाची शाखा रखडते.दरम्यान पूर्व किनारपट्टीवरूनकधी पाऊस त्याचा प्रवास सुरूठेवतो आणि आंध्र – विदर्भातूनराज्यात दाखल होतो. मुंबई मात्र मान्सूनची कायमच प्रतीक्षाकरते. उन्हाच्या तडाख्यापासूनसुटका मिळण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे केरळमध्यपाऊस पोहोचला आहे. पण, मुंबईसह राज्यातील काही भागांतअजूनही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.