मृगनक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसाची हुलकावणी

वर्धा/प्रतिनिधी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा मृग नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्रात सूर्य आला की पावसाळा सुरू होतो. पंचांगानुसार वर्षभरात येणार्या २७ नक्षत्रांपैकी ९ नक्षत्रे ही पावसाची असतात. पावसाच्या नक्षत्रांची सुरूवात ही जरी रोहिणी नक्षत्रापासून होत असली तरी पावसाच्या आगमनाचा आनंद मृग नक्षत्रापासून साजरा केला जातो. यंदा गुरूवार ८ रोजी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला. यंदा मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. मात्र, मृगाच्या पहिल्या दिवशी पावसाच्या सरीच बरसल्या नसून मान्सून रखडल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पाऊस येण्याची अपेक्षा शेतकर्यांसह सामान्य नागरिकांना होती. परंतु, ४४ अंश तापमान वर्धे तील नोंदवण्यात आले. दिवसभर उन्हाच्या झावांनी त्रस्त केले. शेतकर्यांनी भर उन्हाळ्याततापत शेतमशागतीची कामे पूर्णकेली आहे.

शेतशिवार पेरणीसाठीसज्ज्ा झाला आहे. शेतकर्यांचीबी-बियाणे खरेदीसाठी धावपळसुरू आहे. मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस आला व पेरणी साधली तर उत्पादनात वाढ होते, अशी शेतकर्यांची धारणा आहे. यंदा ८ जूनपासून मृग नक्षत्रास सुरूवात झाली. मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. त्यामुळे मृग नक्षत्राच्यापहिल्या दिवशी पावसाच्या सरी येतील, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. परंतु, हवामान खात्यानेमान्सून रखडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊस पुढे सरकल्यास पेरणीस विलंब होणार आहे. त्यामुळे शेतकरीसुद्धा चिंताग्रस्त आहे. गत वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली.

जवळपास दोन महिने पाऊस होता. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. याही परिस्थितीत बळीराजा पुन्हा खरीप हंगामासाठी सज्ज्ा झाला आहे. शेत मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. कर्जबाजारीहून बी-बियाण्यांची खरेदी करीत आहे. आता प्रतीक्षा आहे, ती पावसाची. मृग नक्षत्राला सुरूवात झाली आहे. मृगाच्या सरी कुठे बरसल्याच नाही.