पर्यावरणरक्षणासाठी ऑक्सिजन पार्कचे जिवंत योगदान- डॉ. मिश्रा

वर्धा/प्रतिनिधी वृक्षलागवड हा नियोजित कार्यक्रम न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी पुनदर्ुरुस्ती, पुनर्रचना आणि पुनर्वापर या त्रिसूत्रीचा उपयोग केला पाहिजे. निसर्ग सेवा समितीनिर्मित ऑक्सिजन पार्क अशा योगदानाचे प्रत्यक्ष प्रमाण आहे, असे उद्गार दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी निसर्ग हिल्स येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात काढले. निसर्ग सेवा समितीच्या वृक्षाचळवळीत वर्षभरात ज्यांचे योगदान लाभले आहे, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता दरवर्षी समितीद्वारे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन अग्रवालहोते.

यावेळी गांधी विचार परिषदेचेअध्यक्ष भरत महोदय, इव्होनिथव्हॅल्यू स्टील लि.चे मानव संसाधन अधिकारी आर.के. शर्मा, निसर्ग सेवासमितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीपदाते, यशवंत महाविद्यालयाचे माजीप्राचार्य डॉ. विलास देशमुख, डॉ. विजय बोबडे यांची प्रमुख उपस्थितीहोती. निसर्ग सेवा समितीच्यावर्धापन दिनाचे औचित्य साधूनया कार्यक्रमात ‘निसर्ग संदेश’ या मुखपत्राचे प्रकाशन डॉ. मिश्रा व अतिथींच्या हस्ते करण्यात आले. निसर्ग संदेशच्या प्रकाशनासाठीइमेज ग्राफिक्सचे गिरीश ठाकरे,डॉ. राजेंद्र बोरकर, दिनेश चन्नावार,गणेश अतकरे, प्रो.साईकृपा लँड डेव्हलपर्स, जी. एम. इन्फ्रास्टक्चर व फिल्म डेव्हलपर्सचे गोपीचंद मते यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमात राष्ट्रसंतांचेविचारप्रचारक बाळकृष्ण हांडे यांचे निसर्ग सेवा समितीच्या वृक्ष लागवडीतील योगदानाकरिता तसेच ८० व्या वर्षातील पदार्पणाबद्दल आणि प्रदीप दाते यांचा विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रारंभी मुरलीधर बेलखोडे यांनी निसर्ग सेवा समितीच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा विस्तृत आलेख मांडला. कार्यक्रमाचे संचालन रितेश निमसडे यांनी केले. तर प्रबोधनकार भाऊ थुटे यांनी स्वरचित पर्यावरणगीत सादर करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्टवंदनेने झाली. यावेळी परिसरात अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला बाबाराव भोयर, बाबा सावरकर, प्रकाश येंडे, विनोद वाघ, संजीवनी कानसकर, सुरेखा थुटे, डॉ. शोभा बेलखोडे, प्रमोद खोडे, संगीता बढे, गुणवंत डकरे, ॲड. नंदकुमार वानखेडे, गौतम फुलमाळी, डॉ. राजेंद्र मुंढे, डॉ. विक्रम बेलखोडे, प्रसन्नजीत जवदंड, निलय हांडे, सुरेंद्र वैद्य, प्रमोद भोयर, सुनिल ढाले, प्रफुल्ल दाते, वसंत कुचेवार, डॉ.अनिल लोणारे, दीपक तपासे, मनिष पांडे, वासुदेव उघडे, रमेश भोले, योगशिक्षक दामोदर राउत, आकाश दाते, संजय पालीवाल, यशवंत नलोडे यांची उपस्थिती होती.