अवैध वाळू घाटाविरोधात उपासे यांचे बेमुदत उपोषण

हिंगणघाट/प्रतिनिधी तालुक्यातील वणा नदीवरील येळी, चिकमोह व सावंगी या वाळू डेपोतून आणि धोच्ची घाटातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. या निषेधार्थ तालुका काँग्रेसचे प्रभारी प्रवीण उपासे यांनी बुधवार ३१ रोजी पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरूवात झाली. प्रवीण उपासे यांच्यासोबत अमित चाफले, प्रतिक जामगडे, हेमंत पोटदुखे हे उपोषणाला बसलेले आहेत. शासकीय वाळू घाटात किती वाळूसाठा शिल्लक आहे, अवैधरित्या किती वाळू विकल्या जात आहे, याची गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी उपासे यांची मागणी आहे.

उपोषण मंडपाला प्रहारचे गजू कुबडे, शिवसेनेचे बालू अनासने, सतीश धोबे, सुनील पिंपळकर, जगदीश वांदिले, अक्षय बेलेकर, राष्ट्रवादीचे अनिल भोंगाडे, काँग्रेसचे अरविंद सांगोळे, ज्वलंत मून, डॉ. दिवाकर वानखेडे, गौरव दुधनकर, मंगला ठक, सुनीता ढोले, चंदू टापळे, श्याम ईडपवार, मिलिंद डफ, पवन कटारे, चेतन वैरागडे, प्रवीण भाईमारे, भारत उभाड आदींनी भेट देत उपोषणाला समर्थन जाहीर केले.