श्वेता हळदे यांना आदर्श हिंदी अध्यापक पुरस्कार

वर्धा/प्रतिनिधी हिंगणघाट येथील श्वेता यशवंत हळदे यांना आदर्श हिंदी अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बारामती येथे दिनांक २७ व २८ मे रोजी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे वतीने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत ज्येष्ठ साहित्यकार दामोदर खडसे व अन्य मान्यवरांचे हस्ते श्वेता हळदे यांना सदर पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

हळदे यांनी अध्यापणा व्यतिरिक्त राष्ट्र भाषा हिंदीच्या प्रसारणासाठी विविध विद्यालय व महाविद्यालयात जाऊन व्याख्याने दिली आहे. हिंदीचा प्रचार व प्रसारणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. या त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांना हिंदी आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेला पुरस्काराबद्दल महेश ज्ञानपीठ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष गिरधर राठी, प्राचार्य वैशाली पोळ, डॉक्टर मिलिंद कांबळे, रेवन्नाथ कर्डिले, विनोद डोमकावळेआदी शिक्षक वर्ग तसेच विविध शैक्षणिक संघटनांनीअभिनंदन केले आहे.