राज्यस्तरीय व्हालीबॉल निवड चाचणीमध्ये जनता विद्यालय देवळी चे यश

देवळी/प्रतिनिधी दिनांक २० ते २१ मे २०२३ या कालावधीत ज्यूनियर राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन देवळी शहर काँग्रेस कमिटी व वर्धा जिल्हा व्होलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी येथील क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र व्होलीबॉल म ुला ंचा आणि म ुलींचा संघ निवडण्यात आला. यामध्ये जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी च्या वर्ग १० विच्या कु पूर्वा विजय भोयर आणि कु संतोषी कैकाडी या दोन विद्यार्थिनी ची निवड झाली आहे. निवड झालेल्या संघांचे सराव शिबीर प्रमोद धुर्वे उपस्थित होते.

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी च्या विद्यार्थिनी चे महाराष्ट्र व्होलीबॉल संघात निवड होणे हे संस्थेसाठी आणि शाळेसाठी अभिमानाची बाब आहे असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री रविबाबू प्रमोददादा शेंडे यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या सचिव डॉ सुनिताताई शेंडे, प्राचार्य श्री धर्मे श झाडे, उपमुख्याध्यापक श्री सुरेंद्रउमाटे, पर्यवेक्षक श्री भाऊरावजाधव, क्रीडा शिक्षक श्री सुभाष मेघरे यांनी अभिनंदन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठीश्री अशोक वेळेकर, श्री गोपाल सोनी, श्री विजय पिंपळकर, श्री कुणाल हिवसे, श्री राजू नवठळकर,आकाश विहिरे यांनी परिश्रम घेतले.श्री मिलिंद भागवत यांचे सुद्धासहकार्य लाभले. सर्व शिक्षक बंधू बघीनीयांनी निवड झालेल्या व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेआणि पुढील वाटचाली करिताशुभेच्छा दिल्या.