हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाजवळ दोन ट्रकची धडक

हिंगणघाट/प्रतिनिधी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालय चौकात काल ६ रोजी रात्री १०.३० वाजताचे सुमारास ट्रकचा अपघात झाला. यात एक वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याला सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ३४-बिजी ८२६६ क्रमांकाचा आयशर मालवाहू हिंगणघाट शहरातुन साबुदाणा घेऊन वरोरा येथे निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावर उपजिल्हा रुग्णालय चौकात येताच नागपूरवरून हैदराबादकडे भरधाव जाणार्या सि.जी. ०४ एम. जी. ६७२० क्रमांकाच्या ट्रकने मालवाहूला जोरदार धडक दिल्याने चौक पार करण्याच्या प्रयत्नात असलेला मालवाहू ट्रक पलटी झाला. यात हैदराबादकडे जाणार्या ट्रकचा चालकभानुप्रसाद राईकवार रा. जबलपूर (मध्यप्रदेश) हा गंभीरजखमी झाला.

जखमी वाहन चालकास उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यातआले. परंतु, त्याचीप्रकृती गंभीर असल्यानेत्याला पुढील सेवाग्रामरुग्णालयात पाठविण्यातआले. हिंगणघाट शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरती अपघाताची मालिका सतत सुरू असुन दोन दिवसांपूर्वी झालेल्याअपघातात दोन विदयार्थ्यांना जीव गमवावा लागला.अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांची चमू अपघातस्थळी पोचली. घटनेचा पंचनामा करीत वाहतूक सुरळीत करण्यात आली.