“मन की बात’ने सामान्य माणसांशी जोडण्याची संधी दिली- पंतप्रधान

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज १०० वा भाग होता. पंतप्रधान मोदींनीरेडिओद्वारे १४० कोटी लोकांशी संवाद साधला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदीमन की बातच्या माध्यमातून देश आणि जगाच्या लोकांशी संवाद साधतात. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झालेल्या “मन की बात’ने आज १०० वा भाग पूर्ण केला. हा १०० वा भाग ऐतिहासिक बनवण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. हा भाग देशभरातील ४ लाख केंद्रांवर थेट प्रक्षेपित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात’ दरम्यान आपल्या भाषणात म्हणाले, ‘माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा १०० वा भाग आहे. मला तुम्हा सर्वांची हजारो पत्रे आणि संदेश आले आहेत आणि मी जास्तीत जास्त पत्रे वाचण्याचा, पाहण्याचा आणि संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मित्रांनो, ३ ऑक्टोबर २०१४ हा विजय दशमीचा सण होता आणि आम्ही सर्वांनी मिळून विजय दशमीच्या दिवशी मन की बातचा प्रवास सुरू केला. विजय दशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण. कधी-कधी “मन की बात’ला इतके महिने आणि इतकी वर्षे उलटून गेली यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. “मन की बात’शी संबंधित विषय जनआंदोलन बनला, तुम्ही लोकांनी तो केला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी “मन की बात’ केली तेव्हा जगभर त्याची चर्चा झाली. मन की बात ही माझ्यासाठी इतरांच्या गुणांची पूजा करण्यासारखी आहे. इतरांच्या गुणांची पूजा करावी, असेमाझे मार्गदर्शक म्हणायचे. मित्रअसो वा विरोधक, त्यांच्या चांगल्यागुणांकडून शिकले पाहिजे.

मन कीबातने मला सामान्य माणसांशजोडण्याची संधी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्रएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्याइतर नेत्यांनी मुंबईत “मन कबात’चा १०० वा भाग ऐकला. गृहमंत्री अमित शहा म्हणालेकी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात’ हा केवळ रेडिओ कार्यक्रम नसून ती चांगल्यासाठी सामाजिक परिवर्तनाची चळवळआहे. लोकशाही अभिव्यक्तीचे हे व्यासपीठ आहे.यूपीमध्येही मन की बात ऐकण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली हा ेती. स ंप ूणर् राज्यात ५५ हजार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत जिथे लोक मन की बात कार्यक्रम ऐकत होते. पंतप्रधानांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी भाजपनेही विशेष तयारी केली होती. खासदार, आमदार, मंत्री सगळे आपापल्या भागातील जनतेसोबत मन की बात कार्यक्रम ऐकत होते.