संत गाडगेबाबा कृतिशील समाजसेवक- प्राध्यापक वसंत राठोड

सेलू /प्रतिनिधी संत गाडगेबाबा यांनी खेड्यापाड्यात फिरून समाज जागृतीचे अविरत कार्य केले . समाज जागृती करताना त्यांच्या कार्याला कृतीची जोड होती. त्यांनी सातत्याने विचारांचे बीजारोपण करताना विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जसे की स्वच्छता मोहीम , कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निमर्ूलन, शेतकऱ्यांमध्ये कृषी विषयक जागृती , शिक्षणाचे महत्त्व यांना प्रामुख्याने प्राधान्य दिले, त्यामुळे संत गाडगेबाबा हे एक कृतीशील समाजसेवक होते असे स्पष्ट होते, असे प्रतिपादन प्राध्यापक वसंत राठोड यांनी केले. ते यशवंत महाविद्यालय सेलू येथील स्टाफ क्लब द्वारा आयोजित शोधनिबंध वाचन उपक्रमात “संत गाडगेबाबा यांचे सामाजिक विचार ” या विषयावरील शोधनिबंध सादर करीत असताना बोलत होते.

प्राध्यापक वसंत राठोड पुढे असेही म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी आपल्याला सांगितले की देव हा माणसात आहे , माणसातच शोधा . ते आपल्या कीर्तनात श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या दोषांची जाणीव करून देत असत.याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना डहाणे यांनी अध्यक्षीय भाषणातून संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शोधनिबंधावर उपस्थित श्रोत्यांनी विविध प्रश्न विचारले त्यास प्राध्यापक वसंत राठोड यांनी समर्पक उत्तरे दिली.

प्रश्न उत्तराच्या या चर्चेत डॉ. सुवर्णा डायगव्हाणे, प्रा. सुनील धनुले, प्रा. अजर्ुन खोब्रागडे, प्रा. सोनाली पावडे यांनी सहभाग घेतला. डॉ. संदीप काळे व प्रा. अमित चिनेवार, प्राध्यापिका हिंगे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.सूत्रसंचालन व प्रास्ताविक स्टाफ क्लबचे अध्यक्ष डॉ. अनंत रिंर्ढे यांनी तर आभार प्रा. प्रवीण ठाकरे यांनी मानले. शोधनिबंध वाचन या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.