अतिक-अशरफ हत्या प्रकरणी २४ एप्रिलला सुनावणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी कुख्यात गुंड अतिक आणि अशरफचे हत्या प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर २४ एप्रिलला सुनावणी घेण्यात येईल. ॲड. विशाल तिवारी यांनी याचिका दाखल करीत तत्काळ सुनावणीची मागणी केल्यानंतर सरन्यायाधीशांनी सहमती दर्शवली. अतिक आणि अशरफ यांची पोलिस कोठडीत करण्यात आलेल्या हत्येनंतर याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली स्वतंत्ररीत्या तपासाची मागणी केली आहे. २०१७ मध्ये उत्तरप्रदेशमध्ये आतापर्यंत झालेल्या १८३ चकमकींर्चा तापसही सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली तज्ज्ञ समितीमार्फत करण्याची मागणी करण्यात आली होती. तिवारी यांनी २०२० मध्ये गुंड विकास दुबे याच्या चकमकीचीही सीबीआयमार्फत तपासाची मागणी केली आहे.