आटीओकडून समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी मोहीम

वर्धा/प्रतिनिधी हिंदूूहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून गाड्यांच्या टायरची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ज्या गाड्यांचे टायर घासलेले व जीर्ण झालेले असतील त्या गाड्यांना समृद्धी महामार्गावर बंदी करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डीपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. या महामार्गावरून प्रवास सुरू झाल्यापासून शेकडो अपघात झाले असून काहींना प्राणही गमवावा लागला. सुसाट वेगामुळे गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन तसेच टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी समृद्धीवरील अपघात थांबण्यासाठी आणि महामार्गावरील प्रवास सुखकारक होण्यासाठी परिवहन विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.                           वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर मो. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा वाहनचालकांचे समुपदेशन जिल्ह्यातील एन्ट्री पॉइंटवर गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. विशेषता गाड्यांच्या टायरची तपासणी केली जात असून टायर तसेच सीटबेल्ट नादुरूस्त असलेल्या गाड्यांना समृद्धीवरून प्रवास नाकारला जात आहे. सुस्थितीतील टायर असलेल्या वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. वेग नियंत्रित ठेवावा व सीट बेल्टचा वापर करावा, टायरमध्ये नायट्रोजन भरावे. अशा सूचना प्रादेशिक विभागाच्या वतीने देण्यात येत आहेत. येथील एन्ट्री पाईंटवर प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत गाड्यांचा वेग व अन्य गोष्टी तपासल्या जात होत्या. मात्र, टायर फुटून अपघाताचे प्रमाण वाढल्याने आता टायरवर तपासणीवर विशेष भर द्यालया सुरुवात केली आहे.

समृद्धी महामार्ग हा स्पेशल महामार्ग असून यावर एकही गतिरोधक नाही, हायस्पीड रोड असून कुठेच थांबण्यासाठी हॉटेल व रेस्टारंट नसल्याने तासनतास वाहने सातत्याने चालतात. अशा परिस्थितीमुळे गाडी व्यवस्थित पाहिजे, वाहचालकांनी गाडीचे टायर व्यवस्थित तपासावे तसेच ऑईल तपासून घ्यावे. वाहन चालविताना चालक दक्ष असला पाहिजे. शक्यतोवर टायरमध्ये नायट्रोजन हवा भरावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर मो. शेख यांनी सांगितले. नागपूर ते शिर्डीदरम्यान, महामार्गावर कुठलाच अडथळा आणि वळण नसल्याने वाहने अतिवेगाने धावत आहेत. वाहनधारकांचे वेगावर नियंत्रण नसल्याने आणि टायरचे घर्षण झाल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. समृद्धी महामार्गावरील घेतली आहे. प्रत्येक आरटीओ कार्यालयाच्या हद्दीत ही व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, राज्य रस्ता सुरक्षा कक्षाचे उपायुक्त भरत कळसकर यांच्या मार्गदर्शनात ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.