शेतकरी कष्टकरी व महिलांना दिलासा देणारे सरकार- उपमुख्यमंत्री

रिसोड/प्रतिनिधी यावर्षीच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यां देण्यात आला असून, त्यात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर महिलांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. सद्याचे भाजपा – शिवसेना युतीचे सरकार गतिमान सरकार असून, विकासाला प्राधान्य देणारे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रिसोड येथे १३ एप्रिल २०२३ रोजी आयोजित संकल्प सभेमध्ये ते बोलत होते. या संकल्प केले होते. या संकल्प सभेस भाजपाप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अनंत देशमुख,आमदार रणधीर सावरकर, आमदारवसंत खंडेलवाल, आमदार निलयनाईक, आमदार हरीश पिंपळे,आमदार तानाजी मुटकुळे, आमदारलखन मलिक, माजी आमदार विजय जाधव, माजी आमदारगजानन घुगे, माजी मंत्री संजय कुटे, रणजित पाटील, भाजपानेते राजू पाटील राजे, युवा नेते सभेचे आयोजन युवा नेते ॲड. अनुप धोत्रे, नगराध्यक्ष विजयमाला नकुल देशमुख मित्र मंडळ यांनी आसनकर यांचे सह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, माजी खासदार अनंत देशमुख यांचे रूपाने विदर्भातील जाणते व समजदार नेतृत्व भाजपामध्ये आल्यामुळे विदर्भात भाजप आणखी मजबूत होणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात विकासाचा अजेंडा आपले सरकार राबवीत आहे. पाच वर्षात मोठे प्रकल्प, बंधारे, समृद्धी महामार्ग ज्यामुळे वाशीम जिल्ह्याला कृषी व्यवसायाला मुंबईची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पाठित खंजीर खुपसल्याचे सांगून अडीच वर्षे नाकर्ते सरकार म्हणून विदर्भाचे विकासाचा एकही निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही. एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आता सोबत असून, विकासाची दालने उघडल्याचे त्यांनी सांगितले.