सामान्य रुग्णालयात जागतिक होमेओपथिक दिवस साजरा

वर्धा/प्रतिनिधी डॉ. हानेमन यांचा जन्म दिवस जागतिक होमेओपथिक दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुष विभागात होमेओपथिक दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित जागतिक होमेओपथिक दिन कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी डॉ. हानेमन यांच्या फोटोला हार अर्पण करुनआदरांजली वाहिली. यावेळी डॉ. प्रविण धमाने, आयुष विभाग प्रमुख डॉ. नखाते आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. तडस यांनी होमेओपथिक उपचार व त्याचफायदे यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन होमेओपथिक उपचार पध्दतीचारुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अनुपमा जनईकर यांनी केले तरआभार डॉ. योगिता भेंडे यांनीमानले. कार्यक्रमाला डॉ. लोहकरे, डॉ. शगुपता, डॉ. डोणे, डॉ. माधुरी निमसडकर, डॉ. नम्रता सलुजा, नुरुलहक शेख, डॉ. शंकर तायडे, मनीषा कलवडे, श्याम ठाकरे, अरुणा भागवतव आयुष विभागातील कमर् चार उपस्थित होते.