उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…. देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई/प्रतिनिधी अडीच वर्षानतंर त्यांचा ग ेल्यान ंतरही त्या ंचा राजीनामा काराभार पाहिल्यानंतर नेमके फडतुस कोण आहे हे जनतेला माहित आहे. फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार शरसंधान साधलं. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं ठाकरे म्हणाले. मात्र फडणवीसांनीही त्वरित त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं असं सुनावलं आहे फडणवीस म्हणाले, दोन मंत्री जेलमध्ये गेले आहे. जेलमध्ये घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाही, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अडीच वर्षे घरात बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. आम्हाला तोंड उघडायाला लावू नका.. हा त्यांचा थैयथैयाट आहे याला उत्तर देण्याचे कारण नाही. संयमानं बोला, फडणवीसांचा इशारा मोदींचे फोटो लावून निवडून येतात. खुर्चीसाठी लाळघोटपणे करतात. खरा फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे. ते कोणत्याही भाषेतत बोलले असले तरी मला त्यापेक्षा खालच्या भाषेत मला बोलता येते कारण मी नागपूरचा आहे. मी तसे बोलणार नाही.
संयमानं बोला,
असा इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे. पाच वर्षे राज्याचा गृहमंत्री आहे. अनेकांना अडचणी होत आहे. मी गृहमंत्री पद सोडण्याची वाट बघत आहे. मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवणार आहे. विरोधक राजाविरोधात बोलतात तेव्हा समजावं राजा योग्य आहे, असे फडणवीस म्हणाले. ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्या मारहाण प्रकरणी आता स्थानिक कार्यकर्त्यांची लढाई राज्यातल्या मातब्बर नेत्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात त्यांची तपासणी झाली त्यानंतर त्यांच्यावर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होते. मात्र तिथे भेट होऊ शकली नाही.