डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे नूतनीकरणासाठी धरणे आंदोलन

वर्धा/प्रतिनिधी नागपूरच्या अंबाझरी तलाव कॉम्प्लेक्समध्येअसलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कृतीभवनाची इमारत बेकायदेशीरपणे पाडण्यात आली. त्यामुळे त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधून त्याचे सुशोभीकरण करण्यातयावे, या मागणीसाठी शहरातील आंबेडकरी जनतेनेसोमवार २७ रोजी सिव्हिल लाईन येथे डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणेआंदोलन केले. नागपूरच्या अंबाझरी तलाव संकुलात ४४एकर जागेवर नागपूर महानगरपालिकेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सांस्कृतिक इमारत बांधण्यात आली. परंतु, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार ४४ एकर जमीन एका खासगी कंपनीला व व्यक्तीला लाभाची मान्यता देण्यासाठी दिली.

त्यासाठीशासनाची बेजबाबदारपणे दिशाभूल करून आणि फसवणूक करून मेसर्स गरुडग्या मनोरंजन पार्क या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले. यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, राज्य सरकार आणि कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकसांस्कृतिक भवन बेकायदेशीरपणे पाडणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठीहे धरणे आंदोलन करण्यात आले. शारदा झामरे, डॉ. विद्या राईकवार, मंदा भीमके,प्रियदर्शना भेळे, सुधा आडे, आशिष सोनटक्के, धरमपाल शंभरकर, वसंता भगत, विशाल नागराळे,अरविंद खैरकर, दिलीप पाटील, गोवर्धन ढोके, ज्योत्स्ना वासनिक, प्रवीण राजे, राजू खंदे, संदीप नागराळे, वंदना नाईक, नीता गणवीर, अर्चनागोटे, सिद्धार्थ मनवर, बंडू फुलमाळी, विशालरामटेके, सूरज बुडगे, त्रिशरण लांबे आदींसहआंबेडकरी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्उपस्थित होत्या.