जागतिक मौखिक आरोग्य दिवस साजरा

वर्धा/प्रतिनिधी दत्ता म ेघ े उच्च शिक्षण व संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ) संचालित सावंगी येथील शरद पवार दंत महाविद्यालय व रुग्णालयाद्वारे जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त मुख आणि दंतआरोग्य जागृतीबाबत विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रम आणि शिबिरांच्या निमित्ताने नागरिकांना मुख व दातांची निगा, ात घासण्याचे तंत्र, विविध प्रकारचे दंतविकार, वाईट सवयी व व्यसने, मौखिक आरोग्य, पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाय, वैद्यकीय उपचार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

शासकीय आणि सार्वजनिक ठिकाणांवर मौखिक आरोग्याचा जनजागर करण्यासोबतच रेडिओ एमगिरीवर बालदंतशास्त्र आणि प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. नीलिमा ठोसर यांचे बालकांच्या दंतआरोग्यावर मार्गदर्शक व्याख्यान प्रसारित झाले. मौखिक आरोग्याची निगा या विषयावर विद्यार्थ्यांसाठी पोस्टर आणि मॉडेल निर्मिती स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती फेरी काढत आचार्य विनोबा भावे रुग्णालय आणि दंत रुग्णालय परिसरात जनजागृतीपर पथनाट्ये सादर केली. तसेच मौखिक स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यसनांपासून दूर राहण्याबाबत विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञाही घेतली. या दिनानिमित्त युवा पिढीचे विशेष आकर्षण म्हणून महाविद्यालय परिसरात सेल्फी बूथ निर्माण करण्यात आला होता. मौखिक आरोग्य दिनानिमित्त सामुदायिक दंतआरोग्यशास्त्र विभाग आणि विद्यार्थी कल्याण समितीच्या सहकार्याने स्थानिक आसमंत स्नेहालय येथील मुलामुलींची मुखआरा ेग्य तपासणी करण्यात आली.

तसेच, हिंगणघाट येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शरद पवार दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, संचालक मनीषा मेघे, उपअधिष्ठाता डॉ. अलका हांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आदित्य पट ेल या ंच्या मागर् दशर् नाखाली आयोजित या उपक्रमात डॉ. अमित रेचे, डॉ. प्रियांका पॉल मधू, डॉ. मृणाल मेश्राम, विविध विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.