मत्स्य व्यवसाय संस्थेचे उपोषण सुरूच

वर्धा/प्रतिनिधी कारंजा घा. येथील कारनदी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांनी विविध मागण्यांसाठी १३ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा सातवा दिवस असून निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी सभासदांना उपोषण मागे घेण्यासंबंधी पत्र दिले आहे. शासन स्तरावर यावर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कारनदी संस्थेला सन २०२३ ते २०२८ पर्यंत कारनदी जलाशयाचा सीबीआयमार्फत करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.

तलाव ठेका मासेमारीकरिता देण्यात दरम्यान, १७ रोजी वर्धा येथील यावा, आयुक्त मत्स्य विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे प्रलंबित असलेल्या ऑर्डरवर २२ फेब्रुवारी २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार आयुक्तांनी तत्काळ निर्णय देण्यात यावा, जलादेवी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला शासनामार्फत मिळालेल्या जलाशयाचा ठेका परस्पर ठेकेदाराच्या नावाने करारपत्र करून विकल्याने ही बाब नियमबाह्य आहे.

त्यामुळे याची सखोल चौकशी करून सदर संस्थेला काळ्या यादीत टाकावे, कारनदी संस्थेतील तत्कालीन अध्यक्ष व सचिवांनी १४ वर्षांच्या कालावधीत केलेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त पद्माकर बसवंत आणि सहकारी खोपे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. हा विषय आयुक्तांकडे प्रलंबित असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी उपोषण मंडपातून काढता पाय घेतला.

दरम्यान, पुर्ननिरीक्षण अर्ज प्रधान सचिव (मत्स्य) यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. सदर विषयावर शासन स्तरावरून लवकरच कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात आली असून, उपोषण मागे घेण्याचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी उपोषणकर्त्या सभासदांना देण्यात आले आहे. दरम्यान, १८ रोजी खा. रामदास तडस यांनी उपोषण मंडपास भेट देत समस्या जाणून घेतल्या. खा. तडस यांनी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत दुरध्वनीव्दारे कारनदी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था कारंजा (घा.) या संस्थेच्या मागण्या संदर्भात माहिती देवून चर्चा केली. ना. मुनगंटीवार यांनी यावेळी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

या उपोषणाला विविध संघटनांनी पाठींबा दर्शविला असून मागण्या मान्य होईस्तोवर उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमीका उपोषणकर्ते लक्ष्मण नान्हे, हरिचंद नान्हे, उमेश अमझिरे, अशोक बोरवार, राजू नान्हे व धनराज अमझिरे यांनी घेतली आहे.