कापसाने “काळवंडले’ शेतकऱ्यांचे स्वप्न

वडनेर/प्रतिनिधी फेब्रुवारीचा पंधरवडा लोटला असतानाही कापसाच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. भाववाढीच्या आशेने परिसरातील बहुतेक शेतकर्यांनी कापूसघरातच साठवून ठेवला आहे. तर गरुजूंनी पडत्या भावात कापूस विक्री केली. दर वाढण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकर्यांचे स्वप्न काळवंडले असल्याचे चित्र आहे. दिवाळीपासून कापूस विक्री सुरू झाल्यानंतर जानेवारीपर्यंत८० टक्क्यांपर्यंत कापूस विकला जातो. यावर्षी मात्र जानेवारीमहिना संपून फेब्रुवारीचा पंधरवाडा लोटला तरी जवळपास २५ ते ४० टक्केच कापसाची विक्री झाली आहे. फेब्रुवारी महिना सुरू होताच कापसाचे दरात मोठी घसरण झाल्यामुळेशेतकर्यांची चिंता वाढली. गतवर्षी कापसाला चांगला भावमिळाला होता. त्यामुळे यंदा कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.
अतिवृष्टी आणि रोगामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. हिंगणघाट तालुक्यात सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. सध्या १० ते १२ रुपये प्रति किलोमागे किलो प्रमाणे खर्च करत शेतकरी मजुरांकडून कापूस वेचणी करीत आहे. कापसाची भाव वाढ होईल या आशेने कापूस घरातच साठवूनही ठेवला आहे.अपेक्षित भाव वाढ झाली नाही. मागील वर्षी गुणवत्तेनुसार १० ते १२ हजार रुपयांपर्यंतचे भाव देणारा कापूस यंदा मात्र ८ हजारापर्यंतच पोचला आहे. भाव नसल्यामुळेलागवडीसाठी लागलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. तालुक्यातील शेतकर्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठीनेला नाही.
गतवर्षातील निराशेनंतर शेतकर्यांना नववर्षात संक्रांतीनंतरकापसाचे दर किमान दहा हजार रुपये प्रतिक्विंटल पोचण्याचीअपेक्षा होती. मात्र, दरात घट झाल्याने शेतकर्यांची निराझाली आहे. कापसाचा भाव ७ ते ८ हजारापर्यंत राहिल्यासहाती काय राहील अशी चिंता शेतकर्यांना भेडसावत आहे. शेतमालाचा वाढता उत्पादन खर्च व मिळणारा भाव यामुळेआर्थिक ताळमेळ घालणे अवघड होत चालले आहे. शासनाने कापसाला योग्य भाव दिल्यास उत्पादन खर्च भरून निघेल. नाहीतर कापूस कवडीमोल भावाने विकल्यासव्यापार्यांनाच फायदा होईल, असे दिसते असे शेतकरी अजय ढोक यांनी सांगितले.