बालकांच्या बौद्धिक विकासाबाबत शिक्षकजागृती कार्यक्रम

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील बालरोग विभागाद्वारे सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात बालकांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासाबाबत समस्यांवर शिक्षकजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सावंगी रुग्णालयाच्या हिप्पोक्रेट्स सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालरोग विभाग प्रमुख डॉ. अमर ताकसांडे, नवजात शिशु विभाग प्रमुख डॉ. भावना लाखकर, विकासात्मक बालरोगतज्ज्ञ डॉ. सारिका गायकवाड व डॉ. पूनम उके यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजात बालकांच्या बौद्धिक विकासाबाबत जागरूकता निर्माण करण्याची नितांत गरज असून सावंगी रुग्णालयात मज्ज्ाासंस्थाविकास उपचार केंद्र कार्यरत असल्याने बालकांच्या समस्यांवर अधिक अध्ययन आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा डॉ. अभ्युदय मेघे यांनी यावेळी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांमध्ये असणारी स्वमग्नता, अतिचंचलता, बोलण्यातील समस्या, शैक्षणिक अक्षमता, वर्तवणुकीबाबतच्या समस्या आदींची लक्षणे शिक्षकांना नीटपणे ओळखता यावीत आणि या बालकांना वेळीच योग्य उपचार मिळावेत, यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. अमर ताकसांडे यांनी सांगितले. आधुनिक काळात बालकांमधील वाढत्या बौद्धिक विकासाबाबतच्या समस्यांचे गांभीर्य प्रतिपादित करून डॉ. भावना लाखकर यांनी यासंदर्भात शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे विशद केले. डॉ. सारिका गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन अक्षमतेची कारणे आणि वर्तणुकीसंबंधी उद्भवणाऱ्यासमस्यांबाबत मार्गदर्शन केले. तर,डॉ. पूनम उके यांनी अतिचंचल तसेच स्वमग्न बालकांची लक्षणेओळखून शिक्षकांनी त्यांना कसे शिकवावे, याबाबत मार्गदर्शन केले.कान, नाक व घसारोग विभागातीलवाचाउपचारतज्ज्ञ किरण कांबळेयांनी बालकांमधील वाचादोषआणि त्यावरील उपचारपद्धती याचीमाहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अशिता मलिक आणि डॉ. नंदिनी सागर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माता व बालकआरोग्य समन्वयक खुशबू कुंडूतसेच बालरोग विभागातीलशिक्षकांचे सहकार्य लाभले. याकार्यक्रमात परिसरातील विविध१८ शाळांमधून शंभराहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते.उपस्थित शिक्षकांची सावंगी मेघे रुग्णालयात विनामूल्य आरोग्यतपासणी करण्यात आली.