काश्मीर किलिंग टार्गेट होत आहे- डॉ. प्रवीण तोगडिया

वर्धा/प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पं. पू. डॉ. मोहनजी भागवत यांनी काल जे वक्तव्य केले ते समजूनच केले असेल. कारण, ते मोठे बुद्धिवादी आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या करोडो स्वयंसेवकांची श्रद्धा आहे. देशात सर्व हिंदू जातींना बदनाम करण्याचे काम इंग्रजांपासून सुरू असल्याचे उत्तर आंतर राष्ट्रीय बजरंद दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडीया यांनी पत्रकारांना विचारलेल्या उत्तराला दिले. डॉ. तोगडीया राष्ट्रीय बजरंग दलाच्या एक मुठ्ठी अनाज गरीब हिंदू के लिये या अभियानानिमित्त वर्धे त आले असता ६ रोजी स्थानिक विजय व्यास यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने सत्तेत आली. या सरकारचा कार्यकाळ वर्षभराने संपत असून २०२४ मध्ये निवडणुका होऊ घातल्या आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने अयोध्येच्या धर्तीवर काशी-मथुरेतील मंदिरांचा प्रश्न मार्गी लावावा, केंद्र सरकारने काशी-मथुरा मंदिराचा १९९१ चा कायदा रद्द करावा, लोकसंख्या नियंत्रण कायदा तसेच अँटी लव्ह जिहाद कायदा आणावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय महिला परिषद व ओजस्विनी या संघटनेद्बारा देशभरात महिला सुरक्षा अभियान चालविणार आहे. देशात दरवर्षी ४ लाख महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे सामाजिक दायित्त्व जोपासून गावागावातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन महिला सुरक्षा अभियान सुरू केले आहे. वर्धा येथेही आज महिला सुरक्षेवर प्रशिक्षणाची योजना बनविल्याचे डॉ. तोगडिया म्हणाले.

या प्रशिक्षणामध्ये महिलांना दुरुनच धोका आढळल्यास करण्यात येणार्या उपाययोजना, समाज माध्यमांवर सावधगिरी कशी बाळगावी, बचावासाठी मिरची स्प्रेचा वापर, बचाओ बचाओ की बेल हा आमचा व्यापक महिला सुरक्षेच्या अभियानांतर्गत माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक मुठ्ठी अनाज योजना असून आपल्या संपर्कातील लोकांनी जवळपासच्या २५ घरी एक-एक थैली द्यावी आणि त्यात दररोज मुठभर धान्य टाकण्यात यावे. महिनाभरानंतर हे धान्य एकत्रित करून गोरगरीब हिंदूंना ते वितरीत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकार हिंदूंचे कल्याण करीत असेल तर आपण त्या निर्णयाचे स्वागत करेल, असेही तोगडिया यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद गोवा-महाराष्ट्रचे महामंत्री किशोर डिंकावार, राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत अध्यक्ष अनूप जयस्वाल, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ मंत्री संतोष ठाकूर, तरुण शर्मा, राहुल सोरटे आदींची उपस्थिती होती.