मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मुंबईचा विकास गतीने होईल- पंतप्रधान मोदी

मुंबई/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण झाल्यानंतर मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यांच्या या खास सुरूवातीला उपस्थितांनी टाळा वाजवून दाद दिली. यावेळी विविध राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं. मोदी म्हणाले, यापूर्वी आपण फक्त गरीबीवर चर्चा करायचो, जगाकडं मदत मागायचो आणि कसं तरी आपलं भागवत होतो. पण आता स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदच भारतान मोठं स्वप्न पाहणं सुरु केलं असून ते पूर्ण करण्याची ताकदही आपण तयार केली आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जगातील भारताच्या मोठ्या संकल्पांवर भरवसा आहे. त्यामुळं स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारताच्या निर्मितीत जेवढी उत्सुकता भारतीयांना आहे तितकाच आशावाद जगालाही दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी दावोसचा उल्लेक केला हे जगभरात दिसत आहे. भारत आपल्या सामर्थ्याचा मोठ्या उत्तर प्रकारे सदुपयोग करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनं स्वराज्य आणि सुराज्याची भावना आजच्या भारतात डबल इंजिन सरकारमध्ये प्रबळ रुपानं प्रकट होते. आपण हा काळही बघितला की, गरीबांचा पैसा, करदात्यांच्या पैशाबाबत आपण संवेदनशील नव्हतो, अशा शब्दांत मोदींनी यापूर्वीच्या सरकारांवर टीका केली. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला होता.

मात्र, डबल इंजिनच्या सरकारवर जनतेला विेशास आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा कायपालट होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचे रणशिंगही फुकले. आज मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटीं रुपायांच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. यापूर्वी देशात फक्त गरिबीवर चर्चा करत वेळ काढला जायचा, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली आहे. भारत आपल्या सामर्थ्यांच्या योग्य वापर करत आहे. भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहे. स्वातंत्र्यानंतर भारत पहिल्यांदाच मोठी स्वप्न बघतो आहे. असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला. मात्र, डबल इंजिनच्या सरकारवर जनतेला विेशास आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा कायपालट होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. नुकत्याच झालेल्या दावोस दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी जो अनुभव सांगितला तो दिसूनय येत आहे. भारताच्या संकल्पावर जगभारातील देशांचा विेशास आहे.

जगभर भारतासंदर्भात सकारात्मक वातावरण असून, जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था खराब आहे, पण देशात पायाभूत सुविधांवर अनेक कामे सुरु आहेत. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच कामांना वेग आल्याचे मोदी म्हणाले. देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. देशातील रेल्वे स्टेशनही आता विमानतळांसारखी होऊ लागल्याचं पंतप्रधान म्हणाले. सर्वसमान्यांना चांगल्या सुविधा देणं हेच आमचं लक्ष असल्याचे ते म्हणाले. यावेळी मोदी म्हणाले की, आगामी बीएमसीच्या निवडणुकीत भाजपचं सरकार आल्यास विकास अधिक वेगान होईल. मुंबईचा विकास हवा असल्यास स्थानिक पातळीवर सत्ता हवी. यावेळी त्यांनी मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय स्वार्थासाठी अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले गेले. मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मुंबईचा विकास गतीने होईल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई शहराला चांगलं बनवण्यात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज भारत मोठं स्वप्न पाहण्याचं आणि पूर्ण करण्याचं धाडस करतोय. याआधी फक्त गरिबीवर चर्चा करण्यात येत होती. पण आता आझाद भारताच्या मोठ्या संकल्पावर जगाचा विेशास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला गती मिळतेय. रेल्वे स्टेशनला एअरपोर्टप्रमाणे विकसित करण्यात येत आहे. देशात सर्वात जुन्या रेल्वे स्टेशनपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन विकसित होणार आहे. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा बनतील. सामान्य प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील. कर्मचाऱ्यांना ये-जा करताना सुलभ होईल असं त्यांनी सांगितले. तसेच केवळ रेल्वे स्टेशन नाही तर वाहतुकीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतील. मल्टिमॉडेल कनेक्टिव्हीटी देशातील सर्व शहरात विकसित केले जात आहे. येणाऱ्या काही वर्षात मुंबईचा कायापालट होणार आहे. गरीब मजूर, कर्मचारी, दुकानदार, व्यापाऱ्यांसाठी इथे राहणे सुविधाजनक होतील. त्याचसोबत आसपासच्या जिल्ह्यातील लोकांनाही इथे येणे सोप्पे होणार आहे. मुंबईला नवीन ताकद देणारे अनेक प्रकल्प सध्या सुरु आहे. सर्वकाही ट्रॅकवर येतेय. त्यासाठी मी शिंदे-फडणवीसांचे आभार मानतो असंही मोदी म्हणाले.