राज्यात भाजप-शिंदे गट मविआला भारी, भाजपकडे सर्वाधिक १,४२२ ग्रामपंचायती तर राष्ट्रवादीचे ९८७ ठिकाणी वर्चस्व

मुंबई/प्रतिनिधी राज्यात आज ७ हजार ६८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये ताजी अपडेट्स येईपर्यंत भाजपने एकूण १४२२ ग्रामपंचायतींवर विजयी पताका फडकवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादीने ९८७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं होतं, आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने १.४२२, राष्ट्रवादीने ९८७, शिंदे गट ७०९, काँग्रेसने ६०७ ठाकरे गट ५७१ तर इतर पक्षांनी ८८७ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे .

भाजप-शिंदे गट मविआला भारी

ग्रामपंचायती निवडणुकीत एकत्रित विचार करता भाजप आणि शिंदे गट हा महाविकास आघाडीला भारी पडल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे २,४७३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीने २,४३० ठिकाणी विजय मिळवला. तसेच इतर आघाड्यांनी १०६८ ठिकाणी सत्ता मिळवली आहे. राज्यातील ६१६ ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतींचं एकूण बलाबल

भाजप १४२२

शिंदे गट ७०९
ठाकरे गट ५७१
राष्ट्रवादी ९८७
काँग्रेस ६०७
इतर ८८७
भाजप शिंदे गटाने एकूण २४७३
मविआ २४३०
इतर १०६८

निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायती – ७,६८२ एकूण सदस्य संख्या- ६५,९१६ (त्यापैकी बिनविरोध विजयी सदस्य- १४,०२८). निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा- ७,६१९ (बिनविरोध विजयी सरपंच- ६९९). एकूण ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही.